घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर
-डॉक्टरांच्या संपामुळे गरोदर माता आणि लहान बाळांना त्रास
घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर
-डॉक्टरांच्या संपामुळे गरोदर माता आणि लहान बाळांना त्रास
छत्रपती संभाजीनगर : घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर: कोलकाता येथील डॉक्टर मुलीवर बलात्कार करून केलेल्या हत्येप्रकरणी येथील निवासी डॉक्टरांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांचे हाल झाले. मिनी घाटीत तपासणी झालेल्या गरोदर मातांना ताटकळत बसावे लागले. यामुळे त्यांच्या लहान बाळांना त्रास झाला, याशिवाय शस्त्रक्रियेसाठी आलेल्या अनेकांना माघारी जावे लागले. या प्रकरणामुळे घाटीतील ५३२, तर मिनी घाटीतील ३२ डॉक्टर संपावर आहेत. यावेळी वरिष्ठ डॉक्टर केवळ इमर्जन्सी रुग्णांवर उपचार करीत असताना अनेकांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे किंवा माघारी परतावे लागत आहे.
अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार
कुटेंच्या बोगस कंपन्यांचे जाळे, ज्ञानराधातला पैसा थेट हाँगकाँगला
सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये
लाडक्या बहीणीचे पैसे काढण्यासाठी बँकामध्ये महिलांची गर्दी
घाटीतील 532, तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर संपावर: येथील मिनी घाटीत रुग्णांची मोठी गर्दी होती. तपासणीचा दिवस असल्याचे मोठ्या संख्येने गरोदर माता आल्या होत्या. मात्र सायंकाळचे पाच वाजले तरी सोनोग्राफी, स्कॅनिंगच्या विभागांना टाळे असल्याने त्यांना परत फिरावे लागल्याने त्यांचे हाल झाले. याशिवाय बालरोग विभागात डॉक्टर नसल्याने उपचारांसाठी आणलेले बाळ रडत, कण्हत होते. या परिस्थितीबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे यांना संपर्क केला असता त्यांनी आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. यावेळी तपासणीसाठी आलेल्या गरोदर मातांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. यावेळी प्रथम त्यांना नकार मिळाला त्यानंतर डॉक्टर नाहीत, उद्या येण्याचा सल्ला दिला गेला. दुसरीकडे सोनोग्राफी आणि बालरोग विभागाबाहेर गर्दी वाढत असल्याचे पाहून समाजसेवा अधीक्षकांनी रुग्णांची नावे नोंदवून त्यांना माघारी पाठवल्याने हाल झाले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी शहरातील ५५० रुग्णालये २४ तासांसाठी बंद ठेवली जाणार असल्याचे यांनी होते. खासगी डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे शहरातील १० हजारांची ओपीडी थांबल्या तर ४ हजार शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयटकने आरएमओ कार्यालयाजवळ मूक निदर्शने केली. अॅड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले.
ओपीडी, शस्त्रक्रिया बंद
कोलकात्ता येथील घटनेप्रकरणाी खासगी रुग्णालयांमधील ओपीडी, शस्त्रक्रिया बंद राहणार. दातांचे-डोळ्यांचे दवाखाने बंद असतील. एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे बंद असतील. रक्त तपासणी केंद्रे बंद करण्यात आल्याने अनेकांना याचा फटका बसला.