केज शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था

-दळवे वस्तीतील शाळकरी मुलांची चिखल पाण्यातून पायपीट

0

केज शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था

-दळवे वस्तीतील शाळकरी मुलांची चिखल पाण्यातून पायपीट

केज : शहरातील अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून यामध्ये प्रभाग क्रमांक १७ मधील दळवे वस्तीतील रस्त्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिक नागरीकांकडून नगर पंचायतीकडे रस्त्याच्या कामासाठी मागणी करुनही नगर पंचायत प्रशासने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे दळवे वस्तीतील शाळकरी मुले, महिलांना चिखल,पावसाने साचलेल्या पाण्यातून पायपीट करावी लागत आहे.

शहरापासून दोन किलो मिटरच्या अंतरावर असलेली वस्ती प्रभाग क्रमांक १७ मध्ये येते. या वस्तीत नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. नगर पंचायत पदाधिकारी व अधिकाºयांना दळवे वस्तीचा चिखल,खड्डेमय बनलेला रस्त्याचे नुतणीकरण करण्यास वेळ नाही. तसेच निवडणूकीच्यया काळात मतांचा जोगवा मागणाºया लोकप्रतिनिधींना ही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यास वेळ मिळताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने दळवे वस्तीच्या रस्त्याची दुरावस्था पाहून त्वरीत रस्तेचे काम करुन नागरीकांना होत असलेला त्रास दुर करावा, अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.

निधीची तरतूद नाही

दळवे वस्तीतील रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद झालेली नाही. त्यामुळे तात्पुरते रस्त्याचे मुरूम टाकून मजबुतीकरण करण्याचे काम नियोजन केले जात आहे, असे नगराध्यक्ष सीता बनसोड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.