सोनपेठची भारतीय स्टेट बँकचा कारभार शाखाधिकाऱ्याविनाच

-ग्राहकांना करावा लागतोय आडचणींचा सामना

0

सोनपेठची भारतीय स्टेट बँकचा कारभार शाखाधिकाऱ्याविनाच

-ग्राहकांना करावा लागतोय आडचणींचा सामना

सोनपेठ : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शाखाधिकारी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून बँकेचा कारभार हा शाखाधिकाऱ्याविना सुरु असल्याचे दिसत आहे. या यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांची शाखाधिकाऱ्याच्या सबंधीतील कामे ठप्प झाल्याने अनेकांना आडचणींचा सामना करावा लागत आहे.

तालुक्याची व्यवहार हा येथील भारतीय स्टेट बँक शाखेवरच अवलंबून आहे. या बँकेत शासकीय कर्मचारी, शिक्षक, महिला बचत गट, सर्व योजनांचा लाभ, विद्यार्थी शिष्यवृत्ती, व्यापारी, शेतकरी व अन्य खातेदार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या शाखेत शाखा व्यवस्थापक नसल्याने अनेक कामे खोळंबल्याने ग्राहक, खातेदार व शेतकरी बेजार आहेत. या शाखेत कायमस्वरूपी शाखाधिकारी, क्षेत्र अधिकारी, नसल्यामुळे पिक कर्ज, गोल्ड लोन,शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाटप बंद आहे. तसेच पीक कर्ज नसल्यामुळे शेतकरी सोनेतारण कर्जाकडे वळले असताना सोनेतारण कर्ज पण मिळत नाही व्यापारी वर्गास चालू खात्यावर मिळणारी सी. सी लोन सुविधा मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

तालुक्यातील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक क्षेत्रात उच्च व पदवी, तंत्रशिक्षण घेण्यासाठी भरावी लागणारी फीस शैक्षणिक कजार्तून पूर्ण केली जाते. परंतु शैक्षणिक कर्ज मंजूर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.