संभाजीनगरातील 5 मतदार संघावर भाजपचा दावा

-लोकसभेच्या बदलल्यात २ मतदार संघाची मागणी

0

संभाजीनगरातील 5 मतदार संघावर भाजपचा दावा

-लोकसभेच्या बदलल्यात २ मतदार संघाची मागणी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाने ३ मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मात्र आता भाजपने विधानसभेसाठी ५ मतदारसंघ मागितले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेची जागा शिंदे गटाला दिली होती. त्यामुळे त्या बदल्यात विधानसभेचे आणखी २ मतदारसंघ मिळावे, अशी मागणी भाजपने केली आहे. यामध्ये कन्नड आणि शहरातील पश्चिम किंवा मध्यपैकी एक मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

संभाजीनगरातील ५ मतदार संघावर भाजपचा दावा: यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की, लोकसभेची जागा भाजपने शिंदे या शिवसेनेला सोडली होती. त्यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे. पूर्व मतदारसंघाची जागा भाजप लढवत आहे. यासोबतच मध्य अथवा पश्चिम यापैकी एका जागेची मागणी केली आहे. याशिवाय फुलंब्री, गंगापूर येथे भाजपचे आमदार आहेत. कन्नड या मतदारसंघात महायुतीचा आमदार नसल्याने हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात असणाऱ्या कन्नड वगळता पैठण, वैजापूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि मध्य या मतदारसंघांतील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात आले. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, या ५ मतदारसंघांसह कन्नड मतदारसंघावर आम्ही दावा केला असून तो मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जागा वाढवून मागण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला असतो. मात्र जागावाटपाचा अंतिम निर्णय या वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्टींकडून घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.