अक्षेपार्य वक्तव्या करणाऱ्या रामगिरीवर गुन्हा दाखल करा

- सकल मुस्लिम समाजाची पोलिस प्रशासनाकडे मागणी

0

अक्षेपार्य वक्तव्या करणाऱ्या रामगिरीवर गुन्हा दाखल करा


– सकल मुस्लिम समाजाची पोलिस प्रशासनाकडे मागणी

भोकरदन : सराला बेटाचे रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु यांच्याबदल अक्षेपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ शनिवारी भोकरदन येथे सकल मुस्लिम बांधवांनी या वक्तव्याचा निषेध करत महाराजाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस प्रशासनाला निवेदनाव्दारे केली.

रामगिरीवर गुन्हा: रामगिरीने केलेल्या या वक्तव्यामुळे हिंदु-मुस्लीम या दोन समाजामध्ये जातीय तणाव, धार्मिक व्देष पसरवण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला जात गेला असल्याचे समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा व्यक्तींकडून मुस्लिम धर्मियांविरोधात धार्मिक भावना दुखवून जातीय तणाव निर्माण केल्या जाण्याची शक्यता आहे. अशा वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रामगिरीला अटक करा


महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे, त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरीवर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. पीआय किरण बिडवे यांना निवेदन देताना भोकरदन येथील मुस्लिम समाज बांधव

Leave A Reply

Your email address will not be published.