मराठा समाजाचे आरक्षण फडणवीसांनी रोखले – मनोज जरांगे पाटील

-मनोज जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

0

मराठा समाजाचे आरक्षण फडणवीसांनी रोखले – मनोज जरांगे पाटील

-मनोज जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

जालना : मराठा समाजाचा होणारा रोष पाहून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, मराठा समाजासाठी एखादा निर्णय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल असे त्यांनी सांगितले तर त्याच वेळी पदाचा राजीनामा देईल. इतकेच नाही तर राजकारणातूनही संन्यास घेईल. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली असून ते म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण हे फडणवीस यांनीच रोखले आहे, हे नाकारता येणार नाही. तसे नसते तर सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही.

मराठा समाजाचे आरक्षण फडणवीसांनी रोखले: मी पदाचा राजीनामा देईल. मी राजकारणातून संन्यास घेईन म्हणणाºया फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत? फडणवीस त्यांच्याविषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र तो आरोप चुकीचा आहे. फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुलांवर एक लाखापेक्षा जास्त खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माझ्यावर सुध्दा तीन गुन्हे कालच दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप जरांगे पाटील यावेळी केला. मी गेवराईतून मुंबईला गेल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल केला जात असेल तर मग गेवराईतून जायचे नाही तर कुठून जायचे? असा प्रश्न जरांगे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी मंत्री शंभुराजे यांनी सरकारच्या वतीने हैद्राबाद गॅझेटची प्रत मागविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी तुम्हाला हैदराबाद गॅझेट सापडत नाही का? तुम्हाला सातारा संस्थांच्या नोंदी सापडत नाही का? बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट सापडत नाही का? मराठा आणि कुणबी एकच आहे, याचे किती पुरावे द्यायचे? आम्ही तुम्हाला विरोधक मानलेले नाही. आम्हाला राजकारण करण्याची गरज नसल्याचेही पाटील म्हणाले.

मराठा समाजाचे आरक्षण फडणवीसांनी रोखले: यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही बोलतोय ते चुकीचे नाही. आता फडणवीस यांच्यावर पश्चाताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे. मात्र ही वेळ तुमच्यावर येणार नाही. मी राजकीय बोलत नाही तर तुम्हाला हात जोडून सांगतो की, मराठ्यांचा द्वेष करणे सोडून द्या. मराठ्यांचे वाटोळे होईल, अशी पावले उचलू नका, असे आवाहन देखील यावेळी केले.

मराठा समाज देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करण्याची कारणे

मराठा समाजाच्या तरूणांवर केलेली खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत.
ज्या अधिकाºयांनी आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर हल्ला केला, त्या अधिकाºयांना फडणवीस यांनी बढती दिली.
नोंदी गॅझेट आणि इतर साहित्याच्या आधारे मराठा आणि कुणबी एकच आहे, हे अद्यापपर्यंत फडणवीस यांनी मान्य न केल्यामुळे समाजात रोष पसरत आहे.
सरकारी दप्तरी नोंद मिळाल्यानंतरही मराठा कुणबी नोंदणी प्रमाणपत्र आता दिले जात नाही
मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी असताना मराठा समाजाने जे आरक्षण मागितले नाही ते आरक्षण फडणवीस यांनी का दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर आमच्या विरोधात बोलण्यासाठी ठेवले आहेत, हे फडणवीस कसे नाकारू शकतात.
मराठा कुणबी नोंदी मिळालेल्या अनेकांची कास्ट व्हॅलिडीटी झाली नाही त्या प्रमाणपत्रला फडणवीसांच्या सरकारने मुदत वाढवून का दिली नाही.
फडणवीस यांच्या विरोधात गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप चुकीचा आहे.

फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात आंदोलने उभी केली

यावेळी जरांगे पाटील फडणवीसांना म्हणाले की, तुम्ही सर्वात जास्त छगन भुजबळांचे ऐकले. भुजबळ यांना ताकद दिली. आमच्या विरोधामध्ये ओबीसीचे नेते गोळा करून आमचे विरोधात आंदोलन करायला लावले, हे कसे नाकारता येईल? असा प्रश्न देखील जरांगे यांनी विचारला.

मनोज जरांगेंचा भाजपला इशारा

फडणवीस यांनी मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नये. मराठा लेकरांचे कल्याण व्हावे, असे भाजपमधील मराठा नेत्यांना वाटत आहे. माझी ही पत्रकार परिषद फडणवीस यांनी ऐकावी. मला राजकारणात यायचे नाही. मात्र मी जर राजकारणात आलो तर मी तुमचे सीट निवडून येऊ देणार नाही, हे तुम्हाला सांगून ठेवतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.