आ. संजय शिरसाटांनी विधानसभेत आंबेडकरी जनतेचे प्रश्न कधीच मांडले नाहीत -रमेश गायकवाड

-रमेश गायकवाड यांची शिरसाट यांच्यावर टीका

0

आ. संजय शिरसाटांनी विधानसभेत आंबेडकरी जनतेचे प्रश्न कधीच मांडले नाहीत-रमेश गायकवाड

-रमेश गायकवाड यांची शिरसाट यांच्यावर टीका

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. या जनतेकडे सातत्याने दुर्लक्ष होते. आ. संजय शिरसाट पश्चिम मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले. मात्र त्यांना मतदारसंघातील जनतेचा पाणीप्रश्न सोडवता आलेला नाही. केवळ पेव्हर ब्लॉकची कामे करणे, हेच काम पंधरा वर्षांपासून करत आहेत. पंधरा वर्षांत आंबेडकरी जनतेचे प्रश्न विधानसभेत कधीच मांडले नसल्याची टीका रमेश गायकवाड यांनी केली आहे. ते सह्याद्री लॉन्समध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात बोलत होते.

सह्याद्री लॉन्समध्ये आंबेडकरवादी नेते विचारवंत यांची निर्धार बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदान आले की काही पदाधिकाºयांना पैसे दिले की आपण त्यांना मतदान टाकतो. त्यानंतर निवडून आलेला पुढारी पाच वर्षे आपल्याला विचारत नाही. त्यामुळे मतदान विकू नका, असा सल्लाही गायकवाड यांनी दिला. समाजाच्या प्रत्येक विकासात्मक, अन्यायाबाबत आंदोलने उभा करून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारखा कार्यकर्ता विधानभवनात असायला हवा, असे मत प्राध्यापक ऋषिकेश कांबळे यांनी मांडले. या वेळी अनेक पदाधिकाºयांनी भाषणे करत गायकवाड यांना पाठिंबा दर्शवला.

आंबेडकरी मतदान कशी करणार

आंबेडकरी जनतेचे प्रश्न प्रस्थापित नेते मांडत नाहीत. त्यामुळे शिरसाट यांचा पराभव करणे गरजेचे आहे. त्यासाठी एमआयएमसोबत चर्चा करुन त्यांना पश्चिमसह उर्वरित दोन मतदारसंघात पाठिंबा देण्याचा विचार करु, तर राजू शिंदे अनेक वर्षे भाजपसारख्या जातीयवादी पक्षात होते. त्यामुळे आंबेडकरी जनता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाºयांना मतदान कशी करणार, असा सवाल गायकवाड यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.