बूथ अध्यक्षांच्या मुलीसोबत अश्लील चॅट प्रकरणी भाजप आमदार हंसराजवर गुन्हा दाखल

-भाजप नेते बेटी वाचवा, बेटी पढाओ म्हणत दुसरीकडे मुलीला त्रास देतात : पीडित मुलगी

0

बूथ अध्यक्षांच्या मुलीसोबत अश्लील चॅट प्रकरणी भाजप आमदार हंसराजवर गुन्हा दाखल

-भाजप नेते बेटी वाचवा, बेटी पढाओ म्हणत दुसरीकडे मुलीला त्रास देतात : पीडित मुलगी

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील चुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हंसराज यांच्यावर बूथ अध्यक्षांच्या मुलीने अश्लील चॅट केल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बूथ अध्यक्षांच्या मुलीचे म्हणणे आहे की, जेव्हा ती सहमत नव्हती तेव्हा भाजप आमदार हंसराजने तिला धमकावल्याने तिच्या जीवाला धोका आहे. यामुळे चंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आमदार हंसराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मुलगी म्हणाली की, हे नेते बेटी वाचवा, बेटी पढाओ म्हणतात तर दुसरीकडे मुलीला त्रास देतात.

यावेळी मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, भाजप आमदार हंसराजने अश्लील चॅट केली आणि माझ्याकडून न्यूड फोटो मागितले. यावेळी मी आमदारांना त्यांची कामे करण्यास सांगितले होते. त्यावेळी आमदार म्हणाले की, मला भेटून मी सांगेन ते करावे लागेल. त्यांच्यासोबत राहणाºया कर्मचाºयांनी मला चॅट डिलीट करण्याची धमकी दिली. तुम्ही जेव्हाही आमदाराकडे कामानिमित्त जाल तेव्हा आधी तुम्हाला त्यांचे ऐकावे लागेल, असे ते सांगतात. त्यामुळे मी गप्प राहिले तर गरिबांचेही असेच होईल, असे मुलीने आपल्या जबाबात आहे.

यावेळी पोलिसांनी यासंदर्भात आमदार हंसराजची बाजू जाणून घेण्यासाठी फोन केला असता, त्याचा मोबाईल बंद आढळून आला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भूमिगत झाल्याचा पोलिसांचा संशय यावेळी व्यक्त केला. यावेळी मुलगी म्हणाली की, हे नेते बेटी वाचवा, बेटी पढाओ म्हणतात तर दुसरीकडे मुलीला त्रास देतात. भविष्यात मला किंवा माज्या कुटुंबाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील. आमदाराने माझ्याशी अश्लील चॅट केली. मी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे. पुरावे नष्ट व्हावेत म्हणून त्यांनी माझा फोनही तोडला आहे. चॅट हटवण्यासाठी ते काहीही करू शकतात, अशी भीती या मुलीने व्यक्त केली.

मागील वर्षी शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय हिमगिरी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी हंसराज यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी भाजप आमदार हंसराज यांच्यावर मुख्याध्यापक आणि काँग्रेस नेते यशवंत खन्ना यांना धमकावल्याचा आरोप झाला होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी काँग्रेस नेते यशवंत खन्ना यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रत्येकी दोन नेते शाळेत पोहोचले. नंतर हंसराज यांना परतावे लागल्याने त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शाळेत घुसून गोंधळ घातला होता.

हंसराज विशेषाधिकार भंगाची नोटीस

तत्कालीन केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा हे ५ मे २०१८ रोजी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चंबा येथे आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर नड्डा यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघाला तेव्हा तत्कालीन उपसभापती हंसराज यांची गाडी ही याच ताफ्यात होती. यावेळी डीसीने हंसराज यांच्या गाडीला ओव्हरटेक करून त्यांची कार नड्डा यांच्या कारच्या मागे लावल्यानंतर त्यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.