अनकापल्ले जिल्ह्यात फार्मा कंपनीला आग
-१७ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी
अमरावती : आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात असणाऱ्या एका फार्मा कंपनीला बुधवारी दि.२१ ऑगस्ट रोजी दुपारी ०२:१५ वाजता लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही आग कशामुळे लागली हे अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. ही आग लागल्यानंतर स्फोटाचा आवाज आल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटाच्या जोरामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याची घटनी घडली.
अच्युतपुरम सेझमधील फार्मा कंपनी एस्सेंटिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या युनिटला आग लागल्याने सदर घटना घडली. सरकारी निवेदनानुसार, दुपारी २.१५ च्या सुमारास कारखान्यात रिॲक्टरचा स्फोट झाला, ज्यामुळे आग लागली. जखमींना उपचारासाठी एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारखान्यात ३८१ हून अधिक कर्मचारी काम करतात.हा स्फोट झाला तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होती आणि बहुतेक कामगार बाहेर होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजयन कृष्णन यांनी सांगितले की, १३ जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे.
Hero MotoCorp Harley Davidson X440 हे क्लासिक रोडस्टरचे निओ-रेट्रो रूपांतर
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ
पाक संसदेत उंदरांचा धुमाकूळ उपाय म्हणून शिकारी मांजर तैनात
अपघातानंतर फार्मास्युटिकल कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेला प्रतिसाद अपुरा असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने जीव वाचवण्यासाठी सर्व उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यांना अपघाताच्या कारणांबाबत प्राथमिक निष्कर्षांची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये प्लांटच्या ऑपरेशनमधील संभाव्य मानवी चुका आणि बांधकामातील त्रुटींचा समावेश आहे.
అనకాపల్లి జిల్లా అచ్యుతాపురం సెజ్లో ఉన్న ఫార్మాకంపెనీలో రియాక్టర్ పేలుడు కారణంగా పలువురు మరణించడం తీవ్ర దిగ్భ్రాంతికి గురిచేసింది. మరణించినవారి కుటుంబాలకు నా ప్రగాఢ సంతాపాన్ని, సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. వైయస్సార్సీపీ ప్రభుత్వం ఎల్జీ పాలిమర్స్ బాధితులను ఆదుకున్న తరహాలోనే ఈ…
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) August 21, 2024
नायडू यांनी आरोग्य सचिव एमटी कृष्णा बाबू यांना अनकापल्ले येथे धाव घेण्याचे निर्देश दिले आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. जखमींना नेण्यासाठी गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिका वापरण्यासही मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. नायडू गुरुवारी अपघातस्थळी भेट देतील आणि जखमींची भेट घेणार आहेत.