लातूरच्या शिव छत्रपती संस्थेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार

संस्थाध्यक्ष डॉ.गोपाळराव पाटील यांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ

0

लातूरच्या शिव छत्रपती संस्थेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार

संस्थाध्यक्ष डॉ.गोपाळराव पाटील यांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूर (योगेश साखरे) : शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारी संस्था शिव छत्रपती शिक्षण संस्थेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती चक्क संस्थेच्या अध्यक्षांनीच पत्रकार परिषदे घेऊन दिली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की दि.(24) शनिवार रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी संस्थेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणेच काल दि. (25) रविवार रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. शिवछत्रपती शिक्षण संस्था ही 1968 ला स्थापन झाली. संस्था स्थापन करताना डोळ्यासमोर अनेक उदात्त हेतू ठेवले होते. गरीब,वंचित,शोषित विद्यार्थ्यांना शिक्षण देणे द्यावे, त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा,अशाप्रकारची कामे करत असताना तत्त्व आणि मूल्यांची तडजोड न करता प्रामाणिकपणा व पारदर्शकपणे संस्थेचा कारभार व्हावा अपेक्षित होते.

लातूरच्या शिव छत्रपती संस्थेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार:
जो उद्देश ठेवून या संस्थेची स्थापना झाली होती त्या उद्देशाला तीलांजी दिली असून, या संस्थेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला जात आहे हे मला जड अंतकरणाने सांगावे लागत आहे असेही ते बोलताना म्हणाले. सन 2017 पर्यंत संस्थेत भ्रष्टाचार झाला नाही,गैरव्यवहार होत नव्हता व संस्थेचा कारभारही सुरळीत चालू होता, परंतु 2017 साली सचिव बदलला आणि माझा विश्वासघात करायला सुरुवात केली असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मी सीए कडून संस्थेच्या कारभाराचे ऑडिट करून घेतले असून, त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळले, त्याचवेळी मी आवाज उठवून सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु माझी मागणी सर्वांनी फेटाळून लावली आणि गैर व्यवहार सुरूच ठेवले. संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयाताई भुदेव पाटील यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये याबाबत कार्यकारणीच्या विरोधात धर्मदाय आयुक्त मध्ये तक्रारही दाखल केली आहे. तसेच यशवंत विद्यालयातील लॅब असिस्टंट पद भरण्यासाठी जाहिरात देऊन बनावट ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणे आता न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूरच्या शिव छत्रपती संस्थेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार: संस्थेतल्या काही सदस्यांनी माझे सर्व अधिकार काढून घेतले असून, उपाध्यक्ष यांना ते अधिकार बहाल केले आहेत. त्यांच्याच आदेशानुसार बैठका घेऊन वेगवेगळे ठराव घेऊन निर्णय घेतले जातात. उपाध्यक्ष व सचिव यांनी संस्थेचे पूर्वीचे बँकेतील खाते गोठवून नवीन खाती काढली आहेत. आणि त्या खात्याच्या माध्यमातून राजरोसपणे कोट्यावधींचे गैरव्यवहार चालू आहेत. अशा बेकायदेशीर घटनेमुळे मी व्यथीत झालो, वेळोवेळी मी पत्राद्वारे त्यांना जाब ही विचारला परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या संस्थेची शैक्षणिक परंपरा अत्यंत उज्वल असून, मोठ्या कष्टाने ही संस्था उभी केली आहे. ही संस्था वाचली पाहिजे यासाठी आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांनी राजीनामे द्यावेत. तसे न झाल्यास धर्मादाय आयुक्तांनी यांना बरखास्त करावे अशी आमची मागणी असून, संस्था वाचली पाहिजे हीच आमची अपेक्षा असल्याचे पत्रकारांना सांगितले.

पत्रकार परिषदेत अचानक संस्थेच्या सचिवांची एन्ट्री

संस्थेचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजताच सकाळी महाविद्यालयाचे गेट बंद करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आले असता अचानक संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव पत्रकार परिषदेत आले आणि आत मध्ये चला संस्थेत भ्रष्टाचार झाला नाही चर्चेतून मार्ग काढू असे म्हणाले. परंतु संस्था अध्यक्षांनी गेटच्या बाहेरच पत्रकारांना भ्रष्टाचाराची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.