जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धेत नुतनचा संघ प्रथम
सोफिया सय्यद,सुषमा सोळुंके व मार्गदर्शक शिक्षिका हंडीबाग यांचे सर्वत्र कौतुक
जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धेत नुतनचा संघ प्रथम
-सोफिया सय्यद,सुषमा सोळुंके व मार्गदर्शक शिक्षिका हंडीबाग यांचे सर्वत्र कौतुक
अंजनडोह (प्रतिनिधी) : विश्वाभर कोकीळ यांच्या पुण्यसमरणार्थ दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धा २३ ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक शाळा केज येथे सम्पन्न झाल्या. इयत्ता आठवी दहावी गटात घेण्यात आलेल्या वाद-विवाद स्पर्धेत नुतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे,सचिव गदळे जी.बी.,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, अभिमान डोईफोडे,रामदास साबळे व अजय देशपांडे यांनी प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज मंगरुळकर यांनी केले तर हनुमंत घाडगे यांनी स्पर्धेचे नियम,अटी व गुणदान पद्धतीची माहिती दिली. वाद-विवाद स्पर्धेसाठी जिल्ह्यातुन १०संघ सहभागी झाले होते. वाद-विवाद स्पर्धेसाठी जनार्धन सोनवणे,प्रभाकर बोबडे,प्रा.विठ्ठल समुद्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.वादविवाद स्पर्धेत नुतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह च्या सोफिया पाशा सय्यद व सुषमा सतीश सोळुंके यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हास्तरीय भव्य शालेय वादविवाद स्पर्धेत नुतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह,ता.धारूर या शाळेतील विध्यार्थीनी कु.सोफिया पाशा सय्यद वर्ग नववा व सुषमा सतीश सोळुंके वर्ग दहावा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप शाळेसाठी ट्रॉफी व रोख रक्कम तीन हजार रुपये असे आहे.संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने दोन्ही विध्यार्थीनी आणि मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती हंडीबाग यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुंदरराव अदमाने,अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोंबरे,शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार देशमुख, पर्यवेक्षिका सिमा ठोंबरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षिकेच्या मेहनतीचे व विदयार्थीनी च्या कष्टाचे सर्वस्तरातुन कोतुक होत आहे.