नराधम दादा महाराज अकोलकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी
-घटनेच्या निषेधार्थ हतनूर ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्याचा निर्णय
नराधम दादा महाराज अकोलकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी
-घटनेच्या निषेधार्थ हतनूर ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्याचा निर्णय
कन्नड : तालुक्यातील हतनूर येथील माउली वारकरी कन्या आश्रमात दादा महाराज अकोलकर या ६० वर्षीय संस्थाचालक महाराजाने आश्रमात शिक्षण घेणाºया १४ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, तर दुसºया १३ वर्षीय विद्यार्थिनीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटक करून या नराधमाला रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ आॅगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवारी हतनूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
माउली वारकरी कन्या आश्रमात घडलेल्या प्रकारानंतर या आश्रमात राहिलेल्या १३ मुलींनी आपले शालेय साहित्य व अंथरुण, पांघरुण व जेवणाचे इतर साहित्य तसेच पत्राच्या शेडमध्ये सोडून आपापल्या घरी निघून गेल्या. यापूर्वी म्हणजे सहा वर्षांपूवीर्देखील या महाराजाने आश्रमातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. त्या मुलीच्या नातेवाइकांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या वारकरी संप्रदायाचे काम करतो म्हणून त्याला माफी देत ते प्रकरण मिटवले होते. मात्र पुन्हा या महाराजाने केलेल्या प्रतापमुळे त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दादा महाराज अकोलकर या नराधमाची नीच वृत्ती तसेच खोडीमुळे पत्नी, मुले, कुटुंब आणि इतर सदस्यांनी ८ वर्षांपासून त्याला दूरच केले होते. कीर्तनाच्या कार्यक्रमाल व पैशातून तो उसाच्या पाचटामध्ये बांधलेल्या कुटियामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्या माउली वारकरी कन्या आश्रमात राहणाºया मुलींच्या निवासासाठी जुन्या पत्र्याचे शेड उभारलेले आहे. चुलीवर पाणी गरम करून उघड्यावर या मुलींना अंघोळ करावी लागत होती. पावसाळ्यात तर सर्व खोलीत पाण्याचा सादळा येत होता. सर्व १५ मुली खाली गोण्या टाकून त्यावर अंथरूण टाकत झोपत होत्या. या आश्रमात असणाºया १३ मुलींनी आपले शालेय साहित्य व अंथरुण, पांघरुण व जेवणाचे इतर साहित्य तसेच पत्राच्या शेडमध्ये सोडून आपापल्या घरी निघून गेल्या.