असे काय झाले कि रुग्णाने केला महिला डॉक्टरवर हल्ला
-घटना रुग्णालयाच्या वॉर्डातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
असे काय झाले कि रुग्णाने केला महिला डॉक्टरवर हल्ला
-घटना रुग्णालयाच्या वॉर्डातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
तिरुपती : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला केला. या हल्ल्याची ही घटना रुग्णालयाच्या वॉर्डात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना २४ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर प्रथम प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे केस पकडून नंतर तिला बेडच्या स्टीलच्या फ्रेमवर फेकताना दिसत आहे. हे पाहून वॉर्डात उपस्थित असलेल्या इतर डॉक्टरांनी हल्लेखोराला पकडून प्रशिक्षणार्थी डॉक्टरला वाचवल्याचे दिसत आहे. यानंतर एसव्हीआयएमएस मेडिकल कॉलेजच्या इतर डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला. आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांना रुग्णालयात सुरक्षित वाटत नाही. कर्मचाऱ्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी या डॉक्टरांकडून केली जात आहे. रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला का केला याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
एसव्हीआयएमएस मेडिकल कॉलेज घडलेल्या प्रकारानंतर येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मेडिकल कॉलेजचे कुलगुरू डॉ. आरव्ही कुमार यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिली. या पत्रात लिहिले की, मी शनिवारी आपत्कालीन विभागात ड्युटीवर होते, तेव्हा एका रुग्ण बंगारू राजूने माझ्यावर मागून हल्ला केला. मला मदत करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी नव्हते. जवळच उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाला पकडले. त्याच्याकडे धारदार शस्त्र असते तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी भीती व्यक्त केली.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर एसव्हीआयएमएस रुग्णालयाच्या इतर डॉक्टरांनी विरोध केला. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था असायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.