कर्जासाठी आडवणूक करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिकवला धडा

- शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करत विचारला जाब

0

कर्जासाठी आडवणूक करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिकवला धडा

– शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करत विचारला जाब

जालना : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी कानशिलात लावत जाब विचारत धडा शिकवला आहे. येथील शाखा व्यवस्थापकाने कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांना तुमचे वय झाले आहे. कर्ज फेडणार असल्याचे लेखी हमी पत्र द्या, दूध तसेच इतर अनुदानाचे आलेले पैसे कपात केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे मारहाण केल्याचे बोलले जात असून सदर मारहाणीचा व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कर्जासाठी आडवणूक करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिकवला धडा –
तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्याचे अनुदान, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान, विधवा आणि निराधारांचे अनुदान बँकेच्या व्यवस्थापकाने थांबवले असल्याचा आरोप केला आहे. सामान्य नागरिकांना अरेरावीची भाषा करणाऱ्या या शाखा व्यवस्थापकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरूड बुद्रुक येथील शाखेत शेतकऱ्याला विनाकारण त्रास आणि अडवणूक केली जात होती. दुष्काळाचे अनुदान, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान, विधवा, निराधार, वयोवृध्द या सर्वांच्या पैशाला थांबवून पिक कर्ज भरून द्या, अशी अडवणूक बँकेकडून शेतकऱ्याची केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर करून द्यावेत, असे सांगितले तर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे मयुर बोर्डे यांनी या बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.