शिवरायांच्या स्मारकासाठी राजभवनावर कुदळ मोर्चा काढू

- संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला इशारा

0

शिवरायांच्या स्मारकासाठी राजभवनावर कुदळ मोर्चा काढू

– संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : राजकोट या जलदुर्गावर नौदलामार्फत बसवण्यात आलेला छत्रपतीचा पुतळा गेलेला आणि भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षभराच्या आतच पडला आहे. यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. तत्कालीन बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद करून दोषींवर कारवाई करावी. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत एक विट न रचल्याने हे स्मारक होईल, असे वाटत नाही. त्यामुळे राजभवन या ठिकाणी शिवरायांचे सिंहासनावर बसलेले स्मारक उभारावे, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. जर सरकार हे करणार नसेल तर आम्ही लवकरच राजभवनावर कुदळ मोर्चा काढून शिवस्मारकाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड करेल, असा इशारा डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला.

अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मोदींनी उद्घाटन केल्यापासून आतापर्यंत एक विटही न लावता २७०० कोटी खर्च झाले आहे. हे स्मारक होईल असे वाटत नाही. त्यामुळे राजभवन या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारावे. हे स्मारक अश्वारूढ नसावे. तर सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज असावेत. ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. जर महाराष्ट्र सरकार हे करणार नसेल तर आम्ही लवकरच राजभवनावर कुदळ मोर्चा काढून शिवस्मारकाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड करेल, असा इशारा डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला.

शिवरायांच्या स्मारकासाठी राजभवनावर कुदळ मोर्चा काढू:
शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वषार्नंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाºयांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. मात्र नौदलामार्फत बसवला गेलेला पुतळा पडला हे राज्य सरकारच दुर्देव आहे. हा पुतळा बसवला त्याचवेळी अभ्यासकांनी या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नसल्याची त्यावेळेला चर्चा झाली होती. पण याकडे सबंधितांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ३-४ फेब्रुवारी २०२४ हे शिल्प बदलावे असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले होते. शिवछत्रपतींचे स्मारक घाई गडबडीत तयार करून मोदींच्या हस्ते उद्घाटन केले. त्यांना शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता, असेही डॉ. भानुसे म्हणाले.

दोषींवर कारवाई करा

पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करावी. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि सर्व दोषींवर त्वरित कडक कारवाई करावी. ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

पुतळे पडणार असतील तर ते उभी करावीत का?

आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचे शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीन दोस्त झालेले पाहून भारतीय नौदलाची प्रतिमा मलिन झाली. शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमीनी विचार करावा, असे डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.