कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल
-उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्याच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या गुंतवणूकीमुळे मराठवाड्याचा शाश्वत विकासासोबतच आर्थिक क्रांती घडवेल, मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते उद्योजकांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल: यावेळी सामंत म्हणाले की मराठवाड्यामध्ये एथर एनर्जी, लुब्रिजॉल, जेएसब्ल्यू ,टोयाटो किर्लोस्कर यासारख्या उद्योग समुहांनी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याच्या विकासाबरोबर आर्थिक क्रांती घडवणारी असेल आणि मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल. यामुळे लघुउद्योगास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल असा विशस त्यांनी यावेळी व्यक्त करीत तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पूरक उद्योग विकासाला चालना मिळेल, असेही सांगितले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर,सह कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, पोलीस आयुक्त किरण पवार, पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, एथर एनर्जी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रतो कुमार मित्रा, टोयाटो किर्लोस्कर उद्योग समूहाचे उप व्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश मारू. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रकल्प व्यवस्थापक बीभू नंदा. लुब्रिझॉलचे प्रतिनिधी नितीन मेनगी यांच्यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन आणि भावी पिढ्यांमध्ये देशभक्तीची भावना कशी जागृत कराल?
भारत यावर्षीचा स्वातंत्र्य दिन 2024 77 वा की 78 वा साजरा करेल?
बीडमध्ये शिवसेनेच्या भगव्या सप्ताहास सुरूवात भगव्या झेंड्याचे वाटप
उद्योगासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत आहोत. नवे उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी शासन घेत आहे. या धोरणांमुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे, असे सामंत म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसीआचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी तर सुत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.
स्टेडियमच्या जागेबाबत लवकरच निर्णय
यावेळी मंत्री अतुल सावे यांनी क्रिकेटच्या स्टेडियमसाठी एमआयडीसीची जागा देण्याची मागणी केली असता लवकरच या जागेत बाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
मसीआकडून सामंत यांचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत मसीआ या उद्योग संस्थेच्या मार्फत मंत्री उदय सामंत व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. मानपत्र देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले.