अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार

-अटकेसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच अटक करू : आर्थिक गुन्हे शाखा

0

अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार

-अटकेसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच अटक करू : आर्थिक गुन्हे शाखा

छत्रपती संभाजीनगर : येथील अजिंठा अर्बन बँकेत २००६ ते २०२३ या काळात ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळा झाल्या प्रकरणी बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांच्यासह बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यात अटकपूर्व जामिनासाठी कुलकर्णी प्रयत्न करीत होते. मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक झाली. मात्र मागील वर्षभरापासून फरार असलेल्या झांबड यांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश न आल्याने त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असून अन्य आरोपींनाही लवकरच अटक करू, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे.

अजिंठा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार झांबड यांनी ६० कोटी भरल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली असून बाकी रक्कम भरण्याबरोबर झांबड यांना अटकेची टांगती तलवार कायम आहे. पोलिसांकडून झांबड यांचा शोध घेतला जात असून ते अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अजंठा बँक घोटाळ्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले.

अजिंठा बँकेतील घोटाळया प्रकरणातील आरोपी माजी आमदार फरार: राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित असलेले माजी आ. झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटकेच्या भीतीने फरार झाले होते. यानंतर ते शहरातील अनेक भागात तसेच अनेक सोहळ्यांमध्येही दिसून आले होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेला ते सापडलेच नाहीत, असे सांगितले जात आहे. बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे सीईओ कुलकर्णी यांना जामीन मिळाला असता तर झांबड हे देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार होते. मात्र कुलकर्णी यांचा जामीन नाकारल्यामुळे झांबड यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी झांबड अंडरग्राउंड झाले असले तरी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

झांबड यांचा शोध सुरू

अजिंठा बँकेच्या सीईओ कुलकर्णी यांनी आतापर्यंत दोन ते तीन वेळा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. पण तो आम्ही मिळू दिला नाही. त्यामुळे त्यांना अटक झाली. आता याच गुन्ह्यातील सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहोत. त्यांनाही लवकरच पोलिस अटक करतील, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, संभाजी पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.