अदानी घेणार बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट!

600 मेगावॅट वीज निर्मितीचा पकल्पासाठी अदानी मोजणार 3 हजार कोटी

0

अदानी घेणार बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट!

– 600 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्पासाठी अदानी मोजणार 3 हजार कोटी

नागपूर : आदानी ग्रुपला भष्या रोग झाला की काय असा प्रश्न सध्या लोकांकडून विचारला जात असतानाच येथील औद्योगिक क्षेत्रातील बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांटवर अदानी पॉवर लिमिटेडवर डल्ला मरणार असल्याचा घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता ६०० मेगावॅट आहे. हा प्रकल्प घेण्यासाठी ३००० कोटी रुपये मोजावे लागणार असल्याने त्यासाठीची तयारी अदानी पॉवर लिमिटेडने दर्शवल्याची माहिती समोर येत आहे.

बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट हा विदर्भ पॉवर इंडस्ट्रीजचा भाग असून विदर्भ पॉवर इंडस्ट्रीज ही रिलायन्स पॉवरची उपकंपनी आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड अंतर्गत हा प्रकल्पावर डल्ला मारण्यासाठी अदानी पॉवर सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सोबत बोलणी करीत असल्याचे सांगितले जात आहे. सीएफएम एआरसीने आतापर्यंत १,२६५ कोटी एवढ्या रुपयांचे सर्व कर्ज घेतले आहे. या प्रकल्पासाठी कर्ज देणारी हीच एकमेक कंपनी आहे.

बुटीबोरी थर्मल पॉवर प्लॅटची सुरुवातीची किंमत सुमारे ६ हजार कोटी रुपये होती. मात्र त्यानंतर या प्रकल्पात होणारी वीज निर्मिती बंद झाल्याने या प्लांटचे मूल्यांकन कमी झाले झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अदानी पॉवर लिमिटेडने हा प्रकल्प विकत घेण्यासाठी आपली पसंती दर्शविली आहे. यापूर्वी सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडने सुरुवातीला हा प्रकल्प घेण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जेएसडब्ल्यूने खरेदीसंदर्भात नापसंती दर्शवली होती.

बुटीबोरी येथील थर्मल पॉवर प्लांट हा अदानी पॉवर लिमिटेड घेणार असल्याच्या चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. ऊर्जा निर्मितीमध्ये अदानी हे प्रस्थापित नाव असून त्यांच्या हातात हा प्रकल्प गेल्यास यांचा फायदा विदर्भावाशियांना होणार असल्याचा बनाव केला जात आहे.

स्वस्त दरात वीज न मिळाल्याने सर्वांचीच निराशा

जेव्हा हा प्रकल्प रिलायन्सने सुरू केला होता तेव्हा त्यांना ग्रुप कॅप्टिव्ह पॉवर प्लांट म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे बुटीबोरी आणि जवळील परिसरातील औद्योगिक युनिट्ससाठी स्वस्त दरात वीज मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र फोल ठरल्याने सर्वांचीच निराशा झाली.

बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट हा २०१९ पासून आर्थिक तंगीचा सामना करत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या कंपन्यांनी यांना कर्ज दिले होते त्यांनी विदर्भ इंडस्ट्रीजला दिवाळखोर जाहीर करत प्रकल्पाच्या लीलावासाठी अर्ज केला आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत ही कंपनी दिवाळखोरीत निघोलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

प्रकल्प जुन्या कॅटेगरीनुसार सुरू करावा

बुटीबोरी र्मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन लोणकर हे म्हणाले की, आदानी पॉवर लिमिटेडने हा प्रकल्प जुन्या कॅटेगरीनुसार सुरू केल्यास या भागातील औद्योगिक युनिट्सला स्वस्तात वीज उपलब्ध होईल आणि येथून उद्योगांचे स्थलांतरण थांबेल, अशी भावना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.