आरटीई लकी ड्रॉ मुळे प्रवेश रखडले
प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांना मुलांच्या प्रवेशाची चिंता
आरटीई लकी ड्रॉ मुळे प्रवेश रखडले
-प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांना मुलांच्या प्रवेशाची चिंता
सिल्लोड : शाळा सुरू होऊन एक महिना उलटला आहे. त्यात जिल्हा परिषद व खासगी शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. पण आरटीई लकी ड्रॉ शाळा प्रशासनाकडून प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने आरटीईचे प्रवेश रखडले आहेत. दुर्बल घटकातील पाल्यास इतर मुलांसारखे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे अशी इच्छा पालकांची असते. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील प्रवेशांची यादी जुलै महिना अर्ध्यावर असला तरी मात्र यादी जाहीर झालेली नाही. आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता दिवसेंदिवस सतावत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत आरटीईची प्रवेश प्रक्रिया निम्मी पूर्ण झालेली असते. आरटीईद्वारे प्रवेश अपेक्षित असल्याने अनेक पालक त्यावर अवलंबून असतात. इतर कुठेही प्रवेश न घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी पालकांची मागणी आहे. प्रवेश प्रक्रिया अद्याप न्यायप्रविष्ट प्रक्रिया अजून न्याय प्रविष्ठ आहे. जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळा तसेच इंग्रजी माध्यम शाळा यासर्व शाळांना परवानगी दिली होती. मात्र ही फेटाळण्यासाठी इंग्रजी शाळांचे संस्था चालक मुंबई उच्च न्यायलयात दाद मागण्यासाठी गेले होते. १३ जुलैला मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे.
शासनाने तोडगा काढावा
आरटीई प्रवेशाबाबत होणाºया दिरंगाईमुळे पालक हैराण झाले आहेत. यामुळे शासनाने यावर तोडगा काढून लवकरात लवकर घ्याव. आरटीई प्रवेशाची अपेक्षा असल्याने त्यावर बरेचसे पालक यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने यावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी पालक अविनाश लोखंडे यांनी केली आहे.
नोंदणीकृतशाळांमध्ये २५ टक्के कोटा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशांतर्गत नोंदणीकृत शाळांमध्ये २५ टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत पालक आपल्या पाल्याला आरटीईद्वारे प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहेत.
होय, सर्व पालक चिंतित आहेत, सर्व शाळा सुरू होऊन महिना उलटला, अद्याप आर टी ई मधील विद्यार्थ्यांना शाळेचे तोंडही पाहायला मिळाले नाही…