अजित पवारांचा पक्ष म्हणजे आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी – महेबुब शेख

राश्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेषाध्यक्ष महेबुब षेख यांची अजित पवार गटावर टीका

0

अजित पवारांचा पक्ष म्हणजे आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी – महेबुब शेख

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांची अजित पवार गटावर टीका

बीड : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गट आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट राजकीयदृष्ट्या एकमेकांवर टीका करीत असला तरी हेे दोन्ही गट केव्हा एकत्र होतील हे सध्या तरी सांगता येत नाही. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी अजित पवार गटातील आमदारांवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार गटाने काढलेली जनसन्मान यात्रा नसून ती जनअपमान यात्रा आहे, तुम्ही जनतेच्या अपमान केला. त्यात आज नागपंचमी सण आहे, आज सापाला दुध पाजले जाते या सणानिमित्त एकच दिवस दुध पाजले जाते पण पवार साहेबांनी ज्या सापांना २०-२० वर्ष दूध पाजले त्या सर्व सापांनी फणा काढून दंश मारण्याचे काम केले. यावेळी महेबुब शेख म्हणाले की, या सापांनी नुसता दंश मारला नाही तर त्यांनी पक्ष सुध्दा चोरला आहे.

आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील नेत्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंके परत आले. त्यांचे स्वागत आहे. बाकीचे ४१ म्हणजे आलीबाबा आणि ४० चोरांची टोळी आहे. त्यामुळे या लोकांना परत घेऊ नका असे आवाहन त्यांनी आपल्या पक्षाला केले. अजित पवार यांना बहिणीचे महत्व आधी कधीच माहित नव्हते पण बारामतीच्या जनतेने लोकसभा निवडणूकीत जनतेने दाखवून दिले की लाडकी बायको नाहीतर बहिणच असते म्हणून त्यांना बहिणीचे महत्व समजले असा टोला शेख यांनी अजित पवार यांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.