राज ठाकरेंच्या दौ-यात ऑल इंडिया पॅथर सेनेकडून ‘आरक्षण विरोधी चले जाओ’ ची बॅनरबाजी
गरीब मराठा, दलित, मुस्लिमांनी एकत्र येऊन केलेल्या राजकीय क्रांती ठाकरे घाबरले : सोनवणे
राज ठाकरेंच्या दौ-यात ऑल इंडिया पॅथर सेनेकडून
‘आरक्षण विरोधी चले जाओ’ ची बॅनरबाजी
गरीब मराठा, दलित, मुस्लिमांनी एकत्र येऊन केलेल्या राजकीय क्रांती ठाकरे घाबरले : सोनवणे
बीड : आगामी विधानसभा निवडणूकी तयारी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात दि. ९ ऑगस्ट रोजी ते बीड जिल्हा दौऱ्यावर आले असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. तर दुसरीकडे ऑल इंडिया पॅथर सेनेकडून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरसमोरच ‘आरक्षण विरोधी चले जाओ’, असे बॅनर लावल्याने वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी आजोबांचा पुरावा लागणार
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च दिलासा
संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
शहरातील मागील दोन दिवसांपासून मनसे समर्थकांकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. मात्र या दो-यात राज ठाकरे यांना धाराशीव आणि नांदेड येथे मराठा तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी आपला दौरा आटोपता घेतल्याचे बोलले जात असतानाच राज ठाकरे यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात ऑल इंडिया पॅथर सेनेकडून माफी मागण्याची मागणी केली आहे.
शहरात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या बॅनरमध्ये ठाकरेंना विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात ऑल इंडिया पॅथरचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकही काढले असून त्यात म्हटले की, ‘आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी माफी मागितली नाही. त्यामुळे आम्ही आरक्षण विरोधी चले जाओ चा नारा देत आरक्षण विरोधी प्रवृत्तीला चले जाओ चे आवाहन केले आहे. आरक्षणाला विरोध करणारे मनुवादी आहेत, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.
ऑल इंडिया पॅथर: राज ठाकरे यांना दलित गुलाम करायचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे धोरण त्यांना मान्य नाही. जब तक जातीवाद रहेगा, तब तक आरक्षण रहेगा, असे म्हणत आरक्षण जिंदाबाद, आम्ही आरक्षणवादी, आम्हाला गर्व आहे आम्ही आरक्षणवादी आहोत. आज गरीब मराठा संविधानाच्या मार्गाने आरक्षण मागत आहेत. राज ठाकरे त्यांना हिनवत आहेत. आम्ही गरीब मराठा, दलित, मुस्लिम एकत्र येऊन जी राजकीय क्रांती केली तिला हे घाबरले आहेत. ते ऐक्य आम्ही तोडू देणार नाहीत, असेही नितीन सोनवणे म्हणाले.
भाजप आणि मनसेचे राजकीय अस्तित्व धोक्यात
मराठ्यांनी गैर मावळे नाकारले आहेत. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ओळखलेत, त्यामुळे भाजप आणि त्यांच्या मनसे सारख्या प्रवृत्तीचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या खऱ्या मावळ्यांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न हाणून पाडायचे हे धोरण आहे. असेही असेही नितीन सोनवणे म्हणाले.