मराठा विरूद्ध मराठेत्तरांमध्ये आग लावू पाहणा-या कपटी वृत्तीला पुणेकरांकडून थोबाडीत – अभिनेते किरण माने
अभिनेते किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत
मराठा विरूद्ध मराठेत्तरांमध्ये आग लावू पाहणा-या कपटी वृत्तीला पुणेकरांकडून थोबाडीत – अभिनेते किरण माने
– अभिनेते किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मागिल एक वर्षापासून संघर्ष करीत आहे. या लढ्यात बौद्ध, मुस्लिम, लिंगायत आणि मुस्लिम समाज बांधव साथ देत असतानाच फडणवीस यांच्या माध्यमातून या लढ्याला बदनाम करण्यासाठी काही राजकीय नेते पुढे सरसावले. मात्र जरांगे पाटील यांच्या शांतता राॅलीत काल रविवारी रोजी पुण्यात बौद्ध मुस्लिम आणि इतर समाज बांधवांनी मोठी साथ दिली. यासंदर्भात अभिनेते किरण मानेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या बाळासाहेबांचा गुणधर्म उरला नाही – प्रतापराव जाधव यांची टीका
Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा
परळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय
मराठा विरूद्ध मराठेत्तराच्या कपटी वृत्ती:
या फेसबुक पोस्ट मध्ये अभिनेते किरण माने म्हणतात की, आरक्षणामुळे पेटलेल्या वातावरणात ‘मराठा विरूद्ध मराठेतर समाज’ अशी स्पाॅन्सर्ड आग लावायची ‘अनाजीपंती’ खेळी लै दिवस सुरूय. त्या कपटी वृत्तीला काल पुण्यातल्या समस्त बहुजनांनी सणसणीत थोबाडीत ठेवून दिली!
“मराठा समाज कधीच कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता आणि नसणार.” हे सतत ठासून सांगणार्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत समस्त मराठेतर समाज बांधवांनी सहभाग दाखवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला..
काल खर्या अर्थानं पुण्यानं महामानव महात्मा फुलेंचा वारसा सार्थ ठरवला.
मनूस्मृती आहे । पाखंडाची मुळी । गीर्वाणाचे तळी । विळपळे ।।
आईगाई खाती । वरी शुद्ध होती ।। शूद्रा लढविती । जोती दावी ।।
जय शिवराय… जय भीम !