भोकरदन तालुक्यात लाडकी बहीणचे अर्ज मंजूर
– ७१४९१ अर्जांना अंतिम मंजुरी
भोकरदन : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भोकरदन विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झाली. यात भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील ७१४९१ अर्जांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
भोकरदन तालुक्यात लाडकी बहीणचे अर्ज मंजूर: या बैठकीला समितीचे शासकीय सदस्य तहसिलदार संतोष बनकर, सारिका भगत, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, खिल्लारे, शिवाजीराव नागरे, विनय साळवे, मुख्याधिकारी संतोष वाघमारे आदी उपस्थित होते. १३ आॅगस्टपर्यंत भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यामध्ये नावनोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा आढावा सादर केला. भोकरदन तालुक्यातील ४५१६४ आणि जाफ्राबाद तालुक्यातील २६३२७ पात्र महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले.
बीड भाजप जिल्हाध्यक्ष मस्के उमेदवारीसाठी जरांगेंच्या भेटीला
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन
जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
यावेळी मंजूर लाभार्थ्याच्या वैयक्तीक बॅँक खात्यावर योजनेचा लाभ जमा करण्यासाठी राज्यशासनाकडे शिफारस करण्यात आली. रक्षाबंधनपूर्वी सदर रक्कम त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा होणार आहे. आमदार दानवे म्हणाले, सदर योजना ही माता-भगिनींच्या मनात आर्थिक स्वावलंबनाची भावना निर्माण करणारी व त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्टया जाणीवजागृती करणारी असल्यामुळे एकही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासुन वंचित राहणार नाही, असे म्हणाले.
भोकरदन तालुक्यात लाडकी बहीणचे अर्ज मंजूर
लाभ मिळवुण देण्यासाठी प्रयत्न करा
या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये कुठलाही पक्षपात व हलगर्जीपणा न करता पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळवुण देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करावे, अशी सूचना आमदार दानवे यांनी केली.
दानवेंचे अधिकाºयांना आवाहन
या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक, आंगणवाडी कार्यकर्त्या व आशा स्वयंसेविका यांनी घ्यावी, असे आवाहन दानवे यांनी केले. यावेळी समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.