बांगलादेश मधील हंगामी सरकारचे खातेवाटप

0

बांगलादेश मधील हंगामी सरकारचे खातेवाटप

-परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी मोहम्मद तौहीद हुसेन यांच्याकडे

ढाका : बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी राजीनामा दिला. यानंतर येथे स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी नवनियुक्त सल्लागार समितीच्या हंगामी सरकारचे खातेवाटपची घोषणा केली. यामध्ये संरक्षण खात्यासह २७ मंत्रालयांचा कार्यभार युनूस यांच्याकडेच असणार आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी मोहम्मद तौहीद हुसेन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हंगामी सरकारने केलेल्या खातेवाटपात नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी या सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. हे पद पंतप्रधानांच्या समतुल्य आहे. युनूस यांच्याकडे संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, शिक्षण, ऊर्जा, अन्न, जलसंपदा आणि माहिती मंत्रालयांसह २७ खात्यांची जबाबदारी आहे.
हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या सरकारमध्ये बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सलाहुद्दीन अहमद हे वित्त आणि नियोजन मंत्रालयाचे प्रभारी असतील. तर लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम. सखावत हुसेन यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.