मेजरच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी लष्करी डॉक्टरची निर्दोष मुक्तता

सहाय्यक महिला डॉक्टर आणि रुग्णाच्या आईच्या वक्तव्यात विरोधाभास

0

मेजरच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी लष्करी डॉक्टरची निर्दोष मुक्तता

-सहाय्यक महिला डॉक्टर आणि रुग्णाच्या आईच्या वक्तव्यात विरोधाभास

नवी दिल्ली : जनरल कोर्ट मार्शल हे देशातील भारतीय लष्कराचे सर्वोच्च न्यायालय आहे. लेफ्टनंट कर्नल रँकच्या लष्करी डॉक्टरने मेजरच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी या लष्करी न्यायालयात रविवारी सुनावणी झाली. यानंतर कलम ३५४ प्रकरणी न्यायालयाने डॉक्टरची निर्दोष मुक्तता केली आहे.

या डॉक्टरांवर दोन आरोप होते. पहिला आरोप कढउ च्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा होता. आणि दुसरे प्रकरण महिला सहाय्यकाच्या उपस्थितीत महिला रुग्णांची तपासणी करताना प्रक्रिया न पाळण्याचे होते. कलम ३५४ प्रकरणी न्यायालयाने डॉक्टरची निर्दोष मुक्तता केली आहे. तपासणी करताना प्रक्रिया न पाळल्याबद्दल त्यांना फटकारण्यात आले.

ही घटना जुनी असून २०२२ मध्ये छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन मेजरच्या पत्नी महाराष्ट्रातील लष्करी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तेथे लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या लष्करी डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. दोन-तीन दिवस तपासणी केल्यानंतर महिलेने डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप केला. तेव्हापासून हे प्रकरण सुरू होते. यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी जीसीएमने दिलेल्या जबानीत वैद्यकीय तपासणीदरम्यान उपस्थित असलेल्या सहाय्यक महिला डॉक्टर आणि रुग्णाच्या आईच्या वक्तव्यात विरोधाभास असल्याचे आढळून आले. तपासावेळी दोघांनाही गडबड, आरडाओरडा ऐकू आला नाही. इतर साक्षीदार आणि महिलेचे जबाबही जुळत नसल्याने न्यायालयाने डॉक्टरची विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

कोर्टाकडून दिलासा

कोर्टाकडून दिलासा मिळाल्यावर डॉक्टरांचे वकील आनंद कुमार म्हणाले की, १९ वर्षांच्या सेवेनंतर डॉक्टरांना विनयभंगाच्या तक्रारीला सामोरे जावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.