Briton मधील लीड्स शहरात हिंसाचारामुळे जाळपोळ
हल्लेखोरांकडून पोलिस व्हॅनवर हल्ला
Britonमधील लीड्स शहरात हिंसाचारामुळे जाळपोळ
हल्लेखोरांकडून पोलिस व्हॅनवर हल्ला
नवी दिल्ली : Britonच्या लीड्स शहरात गुरुवारी रात्री उशिरा मोठा हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारामुळे जाळपोळ झाली. यामध्ये शहराच्या मध्यवस्तीत लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गोंधळ घातला. या हिंसाचाराचा फायदा घेत दंगलखोरांनी एका डबल डेकर बसला आग लावून पोलिसाच्या व्हॅनवरही हल्ला केला. दंगलीमागचे कारण, स्थानिक चाइल्ड केअर एजन्सीकडून मुलांना त्यांच्या आई-वडिलांपासून विभक्त करत चाइल्ड केअर होममध्ये घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनाचा भडका
UPSC चेअरमन Manoj Soni यांनी दिला राजीनामा – हे दिले कारण
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड
मिळालेल्या माहितीनूसार, रोमानियाई वंशाच्या एका पित्यावर कथितरित्या एका मुलाला मारहाण केल्याचा आरोप ठेवला होता. यानंतर चाइल्ड केअर एजन्सीचे अधिकारी संबंधित कुटुंबातील ४ मुलांना घेऊन जाण्यासाठी आले. कुटुंब आणि स्थानिक लोकांच्या विरोधानंतर प्रकरणाने हिंसाचाराचे रूप घेतले. मात्र पीडित मुलाच्या वडीलाकडून आपल्या मुलाला मारहाण केली नव्हती. नियमानुसार नातेवाइकांच्या देखरेखीत मुलाचे पालन पोषण योग्य पद्धतीने होत नसल्यास अशा मुलांना चाइल्ड केअर होममध्ये ठेवले जाते.
स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात
सध्या अनेक रस्ते बंद केले आहेत आणि लोकांना हिंसाचारग्रस्त भागांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. पोलिस हेलिकॉप्टरने हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणावर वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारात आतापर्यंत कुणी मृत झाल्याचे वृत्त नाही. मात्र स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हेअरहिल्स भागातील लक्झर स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत.
Royal Enfield Guerrilla 450 Price in India: रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 मार्केट मध्ये
महाराष्ट्रातील लोकप्रिय कुंभे धबधब्यावर पडून सोशल मीडिया Influencer Anvi Kamdar मृत्यू झाला