मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुदतीनंतरही विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी
-इच्छुकांची संख्या जवळपास ७०० ते ८०० च्या वर
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुदतीनंतरही इच्छुकांची गर्दी
-इच्छुकांची संख्या जवळपास ७०० ते ८०० च्या वर
जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावी या मागणीसाठी आग्रही असणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांनी बायोडाटा घेऊन यावे, असे आवाहन केले होते. २४ ऑगस्ट अखेरची मुदत होती. तरीही २५ आॅगस्ट रोजीही इच्छुकांनी हजेरी लावल्याने इच्छुकांची संख्या जवळपास ७०० ते ८०० वर गेल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुदतीनंतरही विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी:
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटी येथे उमेदवारांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. रविवारी दुपारी महाराष्ट्र राज्य वकील संघासोबत मनोज जरांगे पाटील यांनी ४ तास बैठक घेतली तर माजी सैनिक संघटना पदाधिकारी यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंतरवाली सराटी येथील आरक्षण लढ्यास २९ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आरक्षणाच्या भविष्यातील लढ्याचे नियोजन याबरोबरच शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकºयांच्या पिकाला हमीभाव आदी बाबींचे नियोजन, विधानसभा मतदारसंघनिहाय घोंगडी बैठका नियोजनासाठी चिंतन, मंथन करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे २९ आॅगस्ट रोजी बैठक होणार आहे. यासाठी गोदा पट्ट्यातील १२३ गावांतील मराठा बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुदतीनंतरही विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी:
जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे ७०० ते ८०० जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. यावर तज्ज्ञांची समिती हे काम करेल. या अर्जामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. तसेच मराठवाडा, विदभार्तूनही चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे ठरवायचे आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
आंदोलनाचे श्रेय गोरगरीब मराठा समाजाला
आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असून माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे. या यशाचे श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या २९ तारखेला अंतरवलीत एक छोटेखानी चर्चा सत्र ठेवू. हे आंदोलन ऐतिहासिक झालं असून आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं जरांगे म्हणाले.