उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी
- संपर्क कार्यालयात १५० इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र सादर
उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी
– संपर्क कार्यालयात १५० इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र सादर
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केली असल्याने आंतरवाली सराटीत इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदार संघाचा डेटा घेऊन येण्याचे आवाहन केले होते. ७ ते १७ ऑगस्ट दरम्यान जरांगे यांच्या संपर्क कार्यालयात सुमारे १५० इच्छुक उमेदवारांनी आपले परिचय पत्र सादर करून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२ जणांचा समावेश आहे. यामध्ये वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक इच्छुकांची गर्दी असल्याची माहिती दिली जात आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीकडे सरकार आणि विरोधक जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आता निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा जरांगेंनी केली होती. ते २९ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या इच्छुकांना अर्ज सादर करण्याची अट घातली होती.
सोनपेठची भारतीय स्टेट बँकचा कारभार शाखाधिकाऱ्याविनाच
विनेश फोगाटची सोशल मिडीयावर 3 पानांचे पत्र वाचून..
संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा
उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी: मनोज जरांगे यांनी सांगिल्याप्रमाणे २० ऑगस्टपर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्टला आंतरवालीत सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी समन्वयकांना सूचना केल्या असून हे समन्वयक मराठा समाजाला बैठकीसाठी बोलावणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही? याबाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संभाजीनगरचे निवृत्त विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी जोरदार तयारी केली असून ते घनसावंगी मतदारसंघातून आमदार राजेश टोपे यांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे आर्दड यांनी शुक्रवारी सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करीत मतदारसंघात जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे.
इच्छुकांच्या गर्दीत आमदार पुत्रांचा समोवश
पुणे, नाशिक, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले परिचय पत्र जरांगे पाटील यांच्याकडे दिली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून आतापर्यंत जवळपास १२ इच्छुकांनी परिचय पत्रे सादर केली आहेत. यात एका माजी आमदाराचा आणि एका माजी आमदाराच्या पुत्राचादेखील समावेश आहे.
आता माघार नाही
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६५ हजार मतदारांपैकी १ लाख ८१ हजार मराठा मतदार आहेत. त्यामुळे मराठा उमेदवार देऊन ही विधानसभेची जागा जिंकता येऊ शकते. मी दोन वेळा जरांगे यांना परिचय पत्र दिले आहे. आता माघार नाही, तर थेट लढायचे आहे, अशी विनंतीदेखील जरांगे यांना केली आहे, असे इच्छुक उमेदवार सुभाष निकम म्हणाले.