बीडच्या अविनाशची फायनलमध्ये एंट्री
-भारताच्या मेडलचा रंग बदलण्याची आशा
पॅरिस : महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याचा सुपूत्र अविनाश साबळेने अॅथलेटीक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनल गाठली आहे. त्यामुळे आता भारताच्या मेडलचा रंग बदलण्याची आशा निर्माण झाली आहे. अविनाशने पाचवे स्थान पटकावले आणि त्याने फायनलमध्ये एंट्री केली आहे.
बीडच्या खेळाडू अविनाश साबळेने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचून देशाला स्वर्ण पदकाची अपेक्षा दिली आहे. 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहचला आहे.
आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची बैठक
स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले : मनोज जरांगे
राज ठाकरे पक्ष संपवण्यासाठीच मराठवाड्याच्या दौऱ्यावर : लक्ष्मण हाके
अविनाश साबळे दुसऱ्या हीटमध्ये 8 मिनिटे 15:43 वेळेसह स्टीपचेस ३ हीटमध्ये 5व्या स्थानावर राहून आता त्याने फायनल फेरीत प्रवेश केला. अविनाश हा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला भारतीय एथलीट आहे. आता तो 8 ऑगस्टला अंतिम सामना खेळणार आहे.
अॅथलेटीक्सया प्रकारत दोन विभाग असतात. या दोन्ही विभागात जे खेळाडू अव्वल पाच खेळाडूंमध्ये असतात त्यांना फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळवते. अविनाश ह दुसऱ्या गटात होता. या स्पर्धेत सुरुवातीला अविनाशने चांगली आघाडी घेतली होती आणि तो दुसऱ्या स्थानावर होता. पण अविनाशने त्यानंतर आपल्या स्थानाची घसरण होऊ दिली नाही. भारताला अविनाश साबळेकडून फार मोठ्या आशा होत्या. गेल्या वेळीही त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्याला पदक मिळवता आले नव्हते. त्यामुळे त्याला यावेळी पदक मिळवता येते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अविनाशने पाचवे स्थान पटकावले आणि त्याने फायनलमध्ये एंट्री केली आहे.