भोकरदन विधानसभेसाठी आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरु – विजय वडेट्टीवार
- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन
भोकरदन विधानसभेसाठी आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरु – विजय वडेट्टीवार
– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन
भोकरदन : आगामी विधानसभा निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षासाठी घेण्यासाठी आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरु, असा शब्द विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिला. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
भोकरदन येथे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, माजी आमदार सुरेश जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, आता मतदार महायुती सरकारला कंटाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. मराठवाडा हा काँग्रेसचा गड होता आज ही काँग्रेसचा मोठा जनाधार येथे आहे. काँग्रेस हा सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे.
येणाºया विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येणार आहे. भोकरदन येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भोकरदन ची जागा काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यासाठी आघाडी मधील मित्र पक्षांच्या नेत्यांना व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही विनंती करून आग्रह धरू असे सांगितले.
कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू
राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदीच्या नेतृत्वात बहुमत मिळाले नाही लोकांना मोदीची पॉलिसी कळाली आहे केंद्रात सरकार अल्पमतात आहे. प्रास्ताविक राजाभाऊ देशमुख यांनी केले.