एंजल टॅक्सबाबत मोठी घोषणा
एंजल टॅक्सबाबत मोठी घोषणा
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार रोजी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसºया कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे. यामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत. त्यात एंजल कर पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. भारतात २०१२ मध्ये एंजेल टॅक्स लागू करण्यात आला होता. तो रद्द करण्याचा निर्णय अर्थमंत्री सीतारामन यांनी घेतला आहे.
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत -लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत – मनोज जरांगे यांच्या मागणीला यश
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
एंजल टॅक्स हा व्यवसायांवर लागू करण्यात आला होता. सरकारने मनी लाँड्रिंग थांबवण्यासाठी एंजल टॅक्स आणला होता. याशिवाय या कराच्या माध्यमातून सर्व व्यवसाय कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. सरकारने चांगल्या हेतूने ते आणले असले तरी अनेक स्टार्टअप्सना त्याचा तोटा सहन करावा लागत असल्याने अनेक वर्षांपासून देशात याला विरोध होत होता. त्यामुळे हा टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. हा कर रद्द केल्यानंतर देशातील स्टार्टअप्सना फायदा होईल. गेल्या काही वर्षांत देशात स्टार्टअपचे प्रमाण वाढले आहे, याशिवाय अनेक स्टार्टअप्स देखील युनिकॉर्न बनले असून देशातील स्टार्टअपला प्रोत्साहन देणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट असल्याचा अंदाज वर्तवीला जात आहे.
निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप? माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्याने खळबळ
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा १० लाख कोटी रूपयांची तरतुद
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा