प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा

१० लाख कोटी रूपयांची तरतुद

0

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा

– १० लाख कोटी रूपयांची तरतुद

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आज मंगळवार रोजी जाहीर केला. या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनीही घोषणा केल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वात जास्त १० लाख कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत – ग्रामीण आणि शहरी भागात तीन कोटी अतिरिक्त घरे बांधली जाण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक कामगारांसाठी वसतिगृह शैलीतील निवासस्थानांसह भाड्याची घरेही बांधली जाणार आहेत.

अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा
मोदींना मराठा द्वेषाची डनगाळी

यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. शहरी गृहनिर्माण योजना २.० अंतर्गत सरकार १ कोटी लोकांना घरे देणार आहे. याशिवाय रेंटल हाऊसिंगला प्रोत्साहन देण्यावरही काम केले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत शहरी घरांसाठी २.२ लाख कोटी रुपयांची केंद्रीय मदत दिली जाईल.

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारव्दारे चालवली जाते. यामध्ये कच्चे घर आणि जे गरिब प्रवर्गातील आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये शहरी २.० अंतर्गत, १ कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे मिळणार आहेत. यासोबतच औद्योगिक कामगारांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर भाड्याची घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्यांच्यावडे स्व:ताचे घर नाह तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी करीत नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला

योजनेचा लाभ घेता येणार नाही

जे नागरिक कर भरतात, जे कंपनीचे मालक आहेत किंवा सरकारी नोकरी करतात अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करीत आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच शहरी भागात कायमस्वरूपी घर आहे किंवा ग्रामीण क्षेत्र, आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.