‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेबाबत मोठी घोषणा

300 युनिट मोफत उर्जा मिळणार

0

‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेबाबत मोठी घोषणा


300 युनिट मोफत उर्जा मिळणार

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्पात सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये मोफत वीज देण्यासाठी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही योजना सौरऊर्जेवर आधारित असून, यामध्ये एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये दारिर्द्यरेषेखालील लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा

‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ या योजनेंतर्गत कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येत असून सोलर पॅनलच्या किमतीच्या ४० टक्के रक्कम सरकार देते. या योजनेचा फायदा एक कोटी लोकांना होणार आहे. आता या एक कोटी लोकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसवल्यानंतर देशाचे सरकार वार्षिक ७५,००० कोटी रुपयांची बचत करू शकेल, असेही सांगितले जात आहे. या योजनेची घोषणा अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा अनेकदा उल्लेख केला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशन: खासगी क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता

पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाºया व्यक्तीचे स्वत:चे निवासस्थान असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. या योजनेचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे. एखाद्या कुटुंबाला ही वीज पूर्णपणे वापरता येत नसेल, तर ते ही वीज सरकारला विकू शकतील अशी तरतुद ही या योजनेत करण्यात आली आहे. याविषयी सरकारचे म्हणणे आहे की, सौर पॅनेल बसवल्यामुळे घरांची वार्षिक १५,००० ते १८,००० रुपयांची बचत होईल, कारण त्यांना मोफत वीज मिळेल याशिवाय बाकीची वीज ते वीज कंपन्यांना विकू शकणार आहेत.

आतापर्यंत १.२८ कोटी नोंदणी


सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनेल विकत घेतले तर सरकार १ किलोवॅट सौर पॅनेलवर ३०,००० रुपये, २ किलोवॅट सौर पॅनेलवर ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त ७८,००० रुपये अनुदान देण्यात येते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १.२८ कोटी नोंदणी आणि १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती ही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.