निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप?

माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्याने खळबळ

0

निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप होईल

-माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठे भूकंप होतील, त्यामध्ये अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण समर्थक आणि काँग्रेसचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे म्हटल्याने काँग्रेसच्या गोठात खळबळ उडाली आहे.

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ खरा होताना दिसत आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला नसल्याचे समोर आले आहे. तसेच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. या भेटीनंतर आमदार खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले, यामुळे काँग्रेसचे आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याचे उघड झाले आहे.

‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेबाबत मोठी घोषणा
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश डावलून क्रॉस व्होटिंग करणारे आमदार काँग्रेसच्या रडारवर होते. यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित आमदारांचा उल्लेख केल्यानंतर कराड म्हणाले की, हे सगळे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आताच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागल्याने क्रॉस वोटिंग करणाºया पाच ते सात आमदारांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी सांगितले त्यांनाच मी मतदान केले आहे. माज्यासह 7 आमदारांना मिलिंद नार्वेकरांनाच पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी सांगितले होते, असे हिरामण खोसकर म्हणाले. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. जयंत पाटील यांना ज्या ६ आमदारांनी मतदान केले त्यांचे मते फुटले, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाही? त्या ६ जणांवर कारवाई का करत नाही? असा सवाल खोसकर यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच विचारला होता.

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे कोझिकोडमध्ये मुलाचा मृत्यू

आमदार अंतापूरकर चव्हाणांच्या भेटीला

आमदारांनी पक्षादेश डावलला त्या आमदारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निर्णय घेणार : खोसकर

दोन दिवसांपूर्वी काँगेस पक्षाची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सर्वांना सूचना मला देण्यात आल्या आहेत. मला उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा आहे. पण जर उमेदवारी डावलली तर स्थानिक नेते बोलतील, त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचेही खोसकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे खोसकर शिंदेंसोबत जाऊन धनुष्यबाण हाती घेतील असे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.