जपानमधील सुपरमार्केटमधला तांदूळ संपला

-कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे लोकांना आवाहन

0

जपानमधील सुपरमार्केटमधला तांदूळ संपला

-कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे लोकांना आवाहन

टोकिओ : मागील आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जपानमध्ये जून १९९९ नंतर पहिल्यांदाच तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या सुपरमार्केटमध्ये तांदूळ उपलब्ध आहे, तेथे लोकांना कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.

जपान टाइम्सच्या मते, जपानमध्ये मे ते नोव्हेंबर या महिन्यांला टायफून सीझन म्हणतात. या काळात सुमारे २० वादळे येतात. यामुळे अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर येतो. वादळाच्या हंगामातही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वादळे येतात. यावर्षी १९ ते २१ वादळ येण्याची शक्यता आहे. जपान सरकारने या वादळांचा इशारा दिला होता, तेव्हापासून लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

१३ ऑगस्टपासून जपानमध्ये ओबोन महोत्सव सुरू होत आहे. ओबोन उत्सवादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांना आदरांजली वाहतात. त्यांच्या स्मरणार्थ उत्सव साजरे केले जातात. या सणानिमित्त लोक मोठ्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी वाढली आहे. या अचानक निर्माण झालेल्या तांदळाच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने मंगळवारी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. यासंदर्भात कृषी मंत्री तेताशी साकामोटो म्हणाले की, देशात काही ठिकाणी तांदळाच्या साठ्यांची कमतरता आहे, परंतु आम्ही लवकरच मार्ग काढू.

यापूर्वी जुलै 1918 मध्ये जपानमध्ये तांदळाचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे आंदोलने झाली. यावेळी तांदळाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरू असणाऱ्या या शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ, लूटमार, पोलीस स्टेशन आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले. यावेळी सुमारे २५ हजार लोकांना अटक करण्यात आली. या आंदोलनामुळे माजी पंतप्रधान तेरौची मसाटके यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

जूनपर्यंत ३१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटक

जपानमध्ये ओबोन महोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे यंदा जपानमध्ये विक्रमी संख्येने विदेशी पर्यटक आले आहेत. त्यामुळे भाताचीही टंचाई निर्माण झाली आहे. जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या वर्षी जूनपर्यंत ३१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटक जपानमध्ये आले आहेत.

तांदळाचे एकूण उत्पादन ७.३ दशलक्ष टन

जपानमध्ये भाताचे पीक वषार्तून एकदाच घेतले जाते. नवीन भाताची काढणी सप्टेंबरमध्ये सुरू होईल, त्यानंतर बाजारात नवीन पीक आल्याने परिस्थिती सुधारणार आहे. यूएस कृषी विभागाच्या विदेशी कृषी सेवा अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये जपानमध्ये तांदळाचे एकूण उत्पादन ७.३ दशलक्ष टन होते, तर तांदळाचा वापर ८.१ दशलक्ष टन होता.

Leave A Reply

Your email address will not be published.