जम्मू-काश्मीर मध्ये भाजप स्वतंत्र लढणार

-काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ : रैना

0

जम्मू-काश्मीर मध्ये भाजप स्वतंत्र लढणार

-काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ : रैना

श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी भाजपने जम्मू येथे बैठक घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी किशन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना म्हणाले की, जम्मूमध्ये पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप उमेदवारांची पहिली यादी २१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर पुढील आठवड्यापासून पक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता आहे. या निवडणकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह निवडणूक रॅली घेणार आहेत. तसेच जम्मू काश्मीरचे माजी मंत्री चौधरी जुल्फकार अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जुल्फकार यांचे भाजपमध्ये स्वागत

जुल्फकार यांनी २००८ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुका राजौरी जिल्ह्यातील दारहल विधानसभेतून पीडीपीच्या तिकिटावर लढवून विजयी मिळवला होता. यानंतर ते २०१५ ते २०१८ पर्यंत ते मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. यामुळे रविंदर रैना म्हणाले की, जुल्फकार हे जम्मू-काश्मीरचे मोठे नेते आहेत. त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.