म्हाडाच्या नावाने बोगस वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक

-अधिकृत वेबसाईटवरच नोंदणी अर्ज भरा, मंत्री सावे यांचे आवाहन

0

म्हाडाच्या नावाने बोगस वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक

-अधिकृत वेबसाईटवरच नोंदणी अर्ज भरा, मंत्री सावे यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या वतीने म्हाडाच्या माध्यमातून घरांचे बांधकाम केले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी म्हाडामध्ये घर लागावे, यासाठी सर्वसामान्य नागरिक प्रयत्न करत असतात. मात्र म्हाडाच्या नावाने बोगस वेबसाईट तयार करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाल्याने नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच नोंदणी अर्ज भरावेत, असे आवाहन मंत्री सावे यांनी केले आहे.

यावेळी मंत्री अतुल सावे यांनी बोगस वेबसाईट तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देत बोगस वेबसाईट तयार करणाºया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर कायद्या अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.

पोलिसांमार्फत तपास सुरू

सर्वसामान्य नागरिकांनी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपले अर्ज दाखल करावे आणि पैसे भरावेत, असे आवाहन देखील अतुल सावे यांनी केले. यावेळी त्यांनी म्हाडाची बोगस वेबसाईट करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आल्याने या संदर्भात आम्ही तक्रार दाखल केली असून सायबर पोलिसांमार्फत याचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.