निवडणूका पुढे ढकलून सरकार रडीचा डाव खेळतेय – खासदार सुप्रिया सुळे
-खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
निवडणूका पुढे ढकलून सरकार रडीचा डाव खेळतेय – खासदार सुप्रिया सुळे
-खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने हरियाणातील निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी महाराष्ट्रातील निवडणुका अद्यापपर्यंत जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात असे सांगितले जात आहे. त्यातच आता थेट राष्ट्रपती राजवट लागू करत डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने यासंदर्भात प्रतिक्रीया देताना सुप्रिया सुळे यांनी निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही. हा सरकारचा रडीचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
बूथ अध्यक्षांच्या मुलीसोबत अश्लील चॅट प्रकरणी भाजप आमदार हंसराजवर गुन्हा दाखल
आहिल्यानगरमधील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरपीआय आंबेडकर गटात प्रवेश
अदानी घेणार बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट!
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाही. हा सरकारचा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजने शिवाय हे पास होत नसतील तर यातच या सरकारचे अपयश दिसून येते. पैसे वाटूनच निवडणुका जिंकता येतात, असे यांना वाटत असेल तर लोकसभेतही विजयी झाले असते. यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील यांनी काही कमी उद्योग केले नाहीत, असा आरोप खासदार सुळे यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्याच वेळी निवडणूक आयोगाने तारखा न जाहीर केल्याने विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता डिसेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता जात आहे. यामुळे विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार असताना देखील पराभवाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा निशाणा सुप्रिया सुळे लगावला आहे.