जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था

-कालवा दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी मिळेल : अभियंता जाधव

0

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था

-कालवा दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी मिळेल : अभियंता जाधव

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सिंचन डोळ्यासमोर ठेवून जायकवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. धरणावर डावा व उजवा कालवा तयार करण्यात आला. सध्या या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसत आहे. वहन क्षमता निम्म्यावर आल्याने या कालव्यांवर दरवर्षी कोट्यावधींचा खर्च होतो. डावा कालवा २०८ किमीचा असून, याचे सर्वेक्षण दोन वषार्पूर्वी करण्यात आले होते. आता या पूर्ण कालव्याचा ७३५ कोटींचा दुरुस्तीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून, त्याला लवकर मंजुरी मिळेल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

जायकवाडीवर मराठवाड्यातील पावणेदोन लाख हेक्टर शेती ओलिताखाली येते. धरणाच्या डाव्या कालव्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यातील शेती पाण्याखाली येते. यात दरवर्षी धरणाचा पाणीसाठा ३३ टक्कयांच्या पुढे असेल तर पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र यंदा अद्याप धरण २८ टक्के भरले. ३३ टक्कयांच्या पुढे पाणी पातळी असेल तरच पाणीपाळी देण्यात येते. आता कालवा दुरुस्तीचा ७३५ कोटींचा प्रस्ताव दिल्याने वहन क्षमता व अधिकचे पाणी शेतकºयांना मिळू शकते. पैठणच्या डाव्या कालव्याचे मूळ बांधकाम १९७६ ला पूर्ण झाले. कालव्याची लांबी २०८ किमी आणि १२२ किमीची खोली आहे. परभणीला यातून पाणीपुरवठा होतो. कालव्याची वहन क्षमता १००.०८ घनमीटर प्रतिसेकंद आहे.

दुरुस्तीसाठी प्रस्ताव

पैठणसह मराठवाड्यातील शेतीला या कालव्याच्या माध्यमातून फायदा होतो, असे असतानाही आजवर पूर्ण कालव्याची दुरुस्ती एकदाही केली नाही. आता दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला असल्याचे कळते. आम्ही यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहोत., असे माजी सभापती विलास भुमरे म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

आजपर्यंत एकदाही या कालव्याची संपूर्ण दुरुस्ती झालेली नाही. ७३५ कोटींमध्ये दुरुस्ती झाली तर शेतकऱ्यांना विशेष फायदा होणार आहे. पाटबंधारे विभागाने पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण दुरुस्तीचा प्रस्ताव दिल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालव्याची संपूर्ण दुरुस्ती लवकर करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.