म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा

-जनआंदोलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दाते यांची मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी

0

म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा

-जनआंदोलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दाते यांची मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर : म्हाडा वसाहत रोशन गेट येथील रहिवाशांनी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक आणि जनआंदोलन विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण आणि आणि भूभाडे वाढ रद्द करा, अशी मागणी गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

म्हाडा भाडेपट्टा नुतनीकरण रद्द करा: २ ऑगस्ट २०२४ रोजी भाडेपट्टा नुतनीकरण विशेष दंड माफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. म्हाडा कॉलनी, रोशनगेट, चंपा चौक छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी यांच्या दोन प्रमुख मागण्या असुन त्यात या सदरील योजनेचा असा अर्थ निघतो की, २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत १० टक्के या प्रमाणे ३५००० रुपये दंड ज्या रहिवाशाने अद्यापपर्यंत नुतनीकरण केलेले नाही, त्यांनी भरणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२१ पासून प्रतिवर्षी दहा टक्के दंडात्मक रक्कम भरणे आवश्यक आहे.

निर्णयास तात्काळ स्थगिती द्या

म्हाडा कॉलनी ही वर्ष १९७६ ला स्थापन झालेली असून अत्यल्प उत्पन्न गटात येते. या मुळे ही रक्कम सदरील रहिवाश्यांना भरणे अत्यंत त्रास दायक असुन त्याचा भरणा करणे अत्यंत मुश्किल असुन जड जात आहे. तरी सदरील निर्णयास तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते यांनी केली आहे.

मंत्री सावेंकडून शुल्क कमी करण्याचे अश्वासन

सर्वसामान्य जनतेस न्याय द्यावा अशी मागणी केली असता गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांनी सदरची मागणी योग्य असुन या बाबत आठवडाभरात शुल्क कमी करणे बाबत शासनादेश काढण्यात येइल. असे शिष्टमंडळास अश्वासीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.