भारतीय जवान किसान पार्टीचा आंदोलन – आमदार, खासदारांची पेन्शन रद्द करा

-क्रांतीदिनी भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने विधानभवनावर आंदोलन

0

आमदार, खासदारांची पेन्शन रद्द करा

-क्रांतीदिनी भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने विधानभवनावर आंदोलन

अंबाजोगाई : प्रतिनिधी
आमदार, खासदारांची पेन्शन रद्द करावी, सैनिकांना वन रँक,वन पेन्शन तातडीने लागू करा, शेतीमालावरील निर्यातबंदी रद्द करा, गायीच्या दुधाला डिझेल एवढी तर म्हशीच्या दुधाला पेट्रोल प्रमाणे किंमत मिळावी, दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करावी, वन्य जीव प्राणी संरक्षण कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा आदी. मागण्याकरिता विधानभवनावर क्रांतीदिनी शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

शिंदे सरकारने लाडकी बहीण, फुकट रेशन सारख्या योजना आणून विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. शेतकºयांची दीड लाखाची, दोन लाखाची कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे ५० हजार रुपये तसेच अतिवृष्टी, दुष्काळी अनुदान, पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम द्यायला मात्र सरकारकडे पैसे नाहीत. साखर कारखान्यांनी ऊसाचे कोट्यावधी रुपये थकविले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने लक्षात आणून दिल्यानंतरही दुधातील भेसळ थांबवली जात नाही. लेकरा बाळांना भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे. पामतेल आयात करून सर्व खाद्यतेलामध्ये मिसळून विकले जात आहे. बाजार समिती मधून शेतीमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही तसेच शेतीमालावर निर्यात बंदी करून शेतकºयांचे जाणीवपूर्वक नुकसान केले जाते. दररोज १४ कोटी लिटर दूध गोळा केले जाते आणि दुधाचा वापर मात्र ६४ कोटी लिटर आहे. पुणे,मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर,अमरावती सारख्या मोठ्या शहरातून ड्रगचा खुलेआम व्यापार सुरू आहे. दूध माफिया,तेल माफिया यांना अभय दिले जात आहे. कायदा,सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून गुन्हेगारांना मोकळे रान करून दिले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टर मोर्च्याचे आयोजन केले आहे.

ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न

या ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे, सुभेदार रणजित सोळंके, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांची उपस्थिती असणार आहे. ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्ह्यामधून प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी आणि जवानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.