राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह एकूण ३० जणांना नोटीस

0

राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह एकूण ३० जणांना नोटीस

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांना आडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना राज ठाकरेंच्या ताफयावर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह एकूण ३० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. वरेकर यांच्यासह पाच जणांना नोटीस दिली गेली व त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली.

राज ठाकरेंच्या ताफयावर सुपाऱ्या फेकल्या प्रकरणी गुन्हा दाखल: मनसेचे नेते राज ठाकरे बीडमध्ये आले असता शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश वरेकर व इतरांनी ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकून सुपारीबाज नेता म्हणून घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, गोरख सिंघण, दिलावर पठाण, श्रीकृष्ण बबन गायके आणि दत्ता सतीश जाधव यांच्यासह इतर २५ जणांवर गुन्हा नोंद केला होता. शनिवारी सकाळी वरेकर यांच्यासह इतरांना शिवाजीनगर ठाण्यात बोलावून घेत त्यांना नोटीस दिली. त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

आंदोलन ही पक्षाची भूमिका नाही

आमदार संदीप क्षीरसागर यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली व सुरू असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. यादरम्यान खा. संजय राऊत यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना झालेले आंदोलन ही पक्षाची भूमिका नाही असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.