चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला
मनसे नेते प्रकाश महाजन यांची खैरेंवर टीका
चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला
-मनसे नेते प्रकाश महाजन यांची खैरेंवर टीका
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यात शाब्दीक युध्द रंगले आहे. काल प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्याशी केली त्यावर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी आज पुन्हा एकदा खैरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, चंद्रकांत खैरे यांचा निवडणुकीत खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा
रंगा बिल्ला, मिंधे सरकार चले जाओ
Hero SPLENDOR+ XTEC च्या नवीन मॉडेल विक्रमी सेल
मनसे नेते प्रकाश महाजन हे माध्यमांशी सवांद साधताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे हे देव भोळे आहेत. ते असं का बोलले हे मला समजलं नाही. मात्र सतत दोन वेळा झालेला पराभव, पक्षात कमी होत चाललेली पत आणि दोन लोकसभेच्या निवडणुकीत खर्च झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर झाला. त्याचा परिणाम कमरेवर होण्यापेक्षा डोक्यावर जास्त झाला. मी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून ते माझ्यावर चिडले नसतील. ते उलट त्यांच्याच नेत्यावर चिडले असतील. खैरे हे कट्टर शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळेच ते आपल्याच नेत्यावर चिडले असावेत.
मोहम्मद अली जिना बॅरिस्टर आणि बुद्धिमान
उद्धव ठाकरे अनेक वेळा राज ठाकरे यांच्यावर टीका करतात, ते मी समजून घेऊ शकतो. मात्र सुषमा अंधारे आणि इतर लोक माझ्या नेत्यावर बोलल्यावरही आम्ही सहन करतो. राजकारणात तुम्हाला टीका सहन करावी लागेल, असं सांगतानाच मोहम्मद अली जिना हे बॅरिस्टर आणि बुद्धिमान होते. त्यामुळे मी त्यांना चांगल्या व्यक्तीची उपमा दिली. यात राग येण्यासारखं काही नाही. जर बुद्धीचा आणि त्यांचा काही संबंध नसेल तर मी काही करू शकत नाही, असा टोलाही लगावला.