छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा

मनोज जरांगे यांचे भुजबळावर टीकास्त्र

0

छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा

– मनोज जरांगे यांचे भुजबळावर टीकास्त्र

जालना : आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधताना ते म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही. प्रसाद लाड बोलत आहेत, पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळ नाही.

आपले गोरगरीब फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसायचे, पण ते उत्तर देत नाहीत, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ, लाड आणि दरेकर यांचा समाचार घेतला.
मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्ही सर्वच जातीधर्मांचे उमेदवार देणार. फक्त समाजाने मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे. मी उमेदवार म्हणून दगड दिला तरी त्यांनी त्याला निवडून द्यावे. त्यानंतर मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणाले.

राणे साहेबांवर मी बोललो नाही. त्यामुळे त्यांनी नीलेश व नीतेश या दोन्ही मुलांना समजून सांगावे. कारण माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत. मी सरकारवर विश्वास ठेवला, पण हे बिलिंदर लोकांना मध्ये टाकत आहेत. मला ट्रॅप केले जात आहे. फडणवीस हेच खरी सत्ता चालवत असून, यामुळेच भाजपचे वाटोळे होत आहे. मी गोरगरिबांसाठी संघर्ष करत असल्याचे त्यांना पाहवत नाही. मला बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे. फडणवीस यांना हे शोभत नाही. आमची मोहीम बदनाम करू नका. त्यांनी हे प्रकरण गोडी गुलाबीने हाताळले तर ते त्यांच्या अंगलट येणार नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.

७ ते १३ ऑगस्ट माताभगिनी रस्त्यांवर

देवेंद्र फडणवीस आमच्या आई-बहिणीला बोलले. हे आम्ही सहन करायचे? सध्या सरकारसोबत आमचा संपर्क शून्य आहे. जोपर्यंत सहन होते, तोपर्यंत सहन करू. नंतर सर्वकाही बाहेर काढू. ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान कितीही पाऊस किंवा पूर येऊ द्या आमच्या माताभगिनी रस्त्यांवर दिसतील, असे मनोज जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.