मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यामुळे भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा त्रास – अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया

0

मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यामुळे भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा त्रास

-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे पोलिसांच्या वतीने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर होणारी पोलिस भरती ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. यावेळी ते म्हणाले की, सध्या राज्यात रझाकारी सुरू आहे का? पोलिस आयुक्तांचे घरचे राज्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यात येत असून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांच्या हस्ते महिलांसाठी विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. यामध्ये जळगाव रोड वरील दहा किलोमीटर परिसरातील वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ४० किलोमीटर जास्तीचा फेरा घ्यावा लागल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यातच पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ऐनवेळी भरती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा आधीच ठरलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना हा निरोप का देण्यात आला? असा प्रश्न भरतीसाठी आलेल्या तरूणांकडून विचारला जात आहे.

अडीच हजार विद्यार्थ्यांवर अन्याय

ऐनवेळी भरती रद्द करण्यात आल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मी पोलिस आयुक्ताशी बोललो. त्यांनी मनुष्य बळाअभावी भरती रद्द केल्याचे कबुल केले आहे. मात्र अडीच हजार विद्यार्थी येतात, त्यांचे येणे-जाणे, राहणे-खाणे, प्रवास खर्च होतो, त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मनात आल्यानंतर ऐनवेळी भरती रद्द केल्याची एक नोटीस लावण्यात येते. हे योग्य नाही. ही काय रझाकारी आहे का? पोलिस आयुक्तांच्या घरचे राज्य आहे का? हा अडीच हजार विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.