धारूर घाटातील खड्यांना मातीमिश्रीत मुरुमाची मलमपट्टी
धारूर : प्रतिनिधी
शहरातील खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय मार्गावर घाट पायथ्याला असलेल्या पाचशे फूट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर कठडे नाहीत. दोन्ही बाजुंनी तलावाचे पाणी आहे . खड्डे चुकवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजवताना मातीमिश्रीत मुरुमाची मलमपट्टी केली जात आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर अरणवाडी साठवण तलाव आहे. या तलावातून पाचशे फूट अंतराचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. हा रस्ता बोगस करण्यात आल्यामुळे अवघ्या दोनच वर्षात पूर्णपणे उखडला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्याला कसल्याही प्रकारचे कठडे नसून रस्ता अरुंद स्वरूपाचा रस्ता आहे. रस्त्यामुळे वाहन तलावात जाऊ नये यासाठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यात मोठे खड्डे पडल्यामुळे याकडे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
माजलगावचे धरण मृत साठ्यातच
पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजनेचा अध्यादेश जारी
नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार
रस्त्यावर मोठमोठे खड्डे
कायमस्वरुपी उपाययोजनेची आवश्यकता अरणवाडी साठवण तलावाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून खड्डे बुजवताना माती असणारा मुरुम टाकला जात आहे, असे वाहन चालक गोविंद कागणे म्हणाले.