बंगळुरूमध्ये महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार

-आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके तयार

0

बंगळुरूमध्ये महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार


-आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके तयार

बंगळुरू : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ती पार्टी आटोपून आपल्या घरी परत जात होती. घरी जाताना तिने एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली. पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली. यानंतर या दुचाकीस्वाराने मुलीवर बलात्कार करून पसार झाला. यामुळे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली आहेत.

यासंदर्भात बंगळुरूचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ही घटना घडली. पीडित मुलगी शनिवारी रात्री कोरमंगला परिसरात पार्टीसाठी गेली होती. यावेळी तिने हेब्बागोडी भागातील आपल्या घरी परतण्यासाठी एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली होती. त्याचवेळी दुचाकीस्वाराने तिच्यावर हल्ला केला आणि बलात्कार केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार


देहरादूनमध्ये १३ ऑगस्टच्या रात्री बसस्थानकावर ही घटना पहाटे दोनच्या सुमारास ५ जणांनी एका अल्पवयीन मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. यानंतर मुलीला बसमधून उतरवून सोडण्यात आले. पोलिसांनी घटनेच्या चौथ्या दिवशी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांमध्ये तीन बस चालक, एक कंडक्टर आणि एक कॅशियर आहे.

देशभर डॉक्टरांचे आंदोलन सुरू


कोलकाता येथील राधा गोविंद कर मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून देशभरात डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या तपास पथकाने सांगितले की, रविवारी आरोपी संजयची मानसिक चाचणी घेण्यात आली.

२० ऑगस्ट रोजी सुनावणी


प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केलेल्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. सीजेआय व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी पास्टरवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा खंडपीठात असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.