कुटेंविरोधात गुन्हे शाखेकडे ६० ठेवीदारांची तक्रार

-स्वत:च्याच कंपन्यांना ३७४ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर

0

कुटेंविरोधात गुन्हे शाखेकडे ६० ठेवीदारांची तक्रार

-स्वत:च्याच कंपन्यांना ३७४ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर

बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सूतगिरणी चौक शाखेत ठेवीदारांना मंथली इन्कम स्कीमच्या नावाखाली आकर्षक व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात चेअरमन सुरेश कुटेवर १९वा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे ६० ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या असून २ कोटी ८८ लाख ८५ हजार ५५९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपी कुटे याने स्वत:च्याच विविध कंपन्यांना ३७४ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

कुटेंविरोधात गुन्हे
अध्यक्ष सुरेश कुटे व इतर संचालक मंडळाने तक्रारदार माधव हंडे यांना मंथली इन्कम स्कीममध्ये दरमहा आकर्षक परतावा देण्याचे आमिश दाखवले. हुंडे यांनी या योजनांवर विश्वास ठेवून सूतगिरणी शाखेत ठेवी ठेवल्या. त्यावर व्याजासह मुदतीनंतर हंडे यांना ४१ लाख १८ हजार ६५६ रुपये देणे अपेक्षित होते. परंतु संबंधित क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष, शाखा व्यवस्थापक व अन्य संचालक मंडळाने रक्कम परत केली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे ६० ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तीन जिल्ह्यांत ज्ञानराधाच्या ५२ शाखा

ज्ञानराधा सोसायटीची सुरेश कुटेने २०१० मध्ये स्थापना केली. बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांत सुमारे ५२ शाखा सुरू करून ६ लाखांवर ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी जमा केल्या. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्याने स्वत:च्या विविध कंपन्यांना ३७४ कोटी रुपयांचे खिरापत वाटल्याप्रमाणे कर्ज घेतले. मात्र आता कुठे चांगलेच आडचणीत सापडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.