आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची बैठक

-काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन

0

आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची बैठक

-काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली : एससी/एसटी प्रवर्गातील आरक्षणातून क्रीमी लेयर वगळण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले होते. याबाबत पुढची भूमिका ठरविण्यासाठी चर्चा केली जाणार असून यासाठी ही बैठक होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या संदर्भात मोठा निर्णय दिला होता. यामध्ये न्यायालयाने आपलाच २० वर्षे जुना निर्णय रद्द केला होता. यावेळी न्यायालयाने म्हटले होते की, अनुसूचित जाती हा एक समूह आहे, त्यात समाविष्ट असलेल्या जातींच्या आधारे पुढील विभाजन करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना यात म्हटले होते की, १००% कोटा अनुसूचित जातींमधील कोणत्याही एका जातीला देता येणार नाही. तसेच अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या जातीचा कोटा ठरवण्यापूर्वी, त्यांच्या वाट्याबद्दल ठोस डेटा असणे आवश्यक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा निर्णय दिला आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या जातींच्या आधारे अनुसूचित जातीचे विभाजन करणे हे घटनेच्या कलम ३४१ च्या विरोधात नाही, असे सांगण्यात आले.

राज्य सरकारे मनमानी निर्णय घेऊ शकत नाहीत

न्यायालयाने आपल्या नव्या निर्णयात राज्यांना आवश्यक निर्देशही दिले आहेत. राज्य सरकारे मनमानी पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.