अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून पांघरून टाकण्याचे प्रयत्न
अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून पांघरून टाकण्याचे प्रयत्न
मुंबई : राज्यातील युती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून संकटमोचक म्हणून ओळख असलेले नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी मंत्री गिरीश महाजनांनी केली असता, त्यावर अजित पवार यांनी निधी कुठून आणू? आता काय जमिनी विकायच्या का? असा प्रतिप्रश्न केल्याचं बोलले जात आहे. यामुळे युती सरकारमध्ये मंत्र्यांच्या गटात नेमक चाललय तरी काय? अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये जरी सुरू असली तरी मात्र भाजप नेते आणि कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे म्हणत पांघरून टाकण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे.
खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण Gold Rate after Budget Session 2024
बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर आमदार खासदार हाय… हाय.. म्हणत आंदोलकांचा संताप
या वादावर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीप्रमाणे निधी वाटपाबद्दल अजित पवार यांच्याविषयी तक्रार असण्याचे काही कारणच नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत एक बेसिक फरक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फक्त खुर्ची हवी, जनतेची कामं हा विषयच त्यांच्या अजेंड्यावर नव्हता. मला वाटतं, आपल्या कार्याकाळात मंत्रालयातही ते एक-दोन वेळाच गेलेत, मात्र एकनाथ शिंदे हे योजनांसाठी आग्रही असतात.
वित्त मंत्र्यांना एक रुपयाची जरी तरतूद करायची असेल ना, तरी त्यांना मुख्यमंत्र्यांची सही लागते, असा नियम आहे. मी ही अर्थ मंत्री राहिल्यामुळे मला तो ठावूक आहे. त्यामुळे वित्त मंत्री या नात्याने अजित पवार कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निधीसाठी अडवू शकत नाहीत.
महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती -भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास!
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
यावेळी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी वगैरे काहीही झालेलं नाही. अर्थमंत्री अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे तिन्ही मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यासमोर अशी खडाजंगी कोणी करेल का? एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखाद्या प्रस्तावावर अभिप्राय कोणी व्यक्त करेल, खडाजंगीचा अर्थ काय? या कपोलकल्पित कथा आहेत. मागे माझ्या बद्दल आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दलही असंच काही बाहेर बोललं गेलं होतं. आम्हा दोघांनाही तेव्हा त्याचं आश्चर्य वाटलं होतं की, असं का बोललं जात आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.